HW News Marathi
महाराष्ट्र

गणेशोत्सवात जुगार खेळू देण्याची आमदार, खासदारांची मागणी

औरंगाबाद : ‘गणेशोत्सवात टाइमपाससाठी कार्यकर्त्यांना पत्ते, जुगार खेळण्यास सूट द्या, अशी धक्कादायक मागणी भाजपा व शिवसेनाच्या आमदार-खासदारांनी शांतता समितीच्या बैठकीत केली. त्यामुळे पोलीस आयुक्तांसह सगळेच अचंबित झाले आहेत.गणेशोत्सव व बकरी ईदनिमित्त पोलीस आयुक्तालयाने बुधवारी तापडिया नाट्यमंदिरात शांतता समिती बैठक आयोजित केली होती. या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, मनपा आयुक्त

डी. एम. मुंगळीकर, धर्मादाय उपआयुक्त विवेक सोनुने यांच्यासह शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी होते.

‘गणेशोत्सव काळात जागत असताना काही जण टाइमपास म्हणून पत्ते खेळत असतात. त्यांच्यावर कारवाईत पोलिसांनी कानाडोळा करावा. त्यांना जुगार खेळू द्यावा,’ अशी धक्कादायक मागणी भाजपाचे आ. अतुल सावे यांनी केली. तर शिवसेनेचे आ. संजय शिरसाट यांनी, ‘कार्यकर्त्यांनी पत्ते खेळावेत; पण त्यात जास्त पैसे लावू नयेत. मोठी रक्कम आली की, कार्यकर्त्यांमध्ये भांडणे होतील, त्यातून मारामारीपर्यंत प्रकरण वाढेल. यासाठी पत्ते खेळा; पण कमी पैसे लावा,’ असा सल्ला दिला.

त्यातच शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांनी तर हद्दच केली. ते म्हणाले, नोटाबंदीमुळे लोक वर्गणी देण्यास तयार नाहीत. यामुळे गणेश मंडळांची आर्थिक परिस्थिती खराब आहे. त्यामुळे पत्ते खेळा; पण जुगारात मिळालेला पैसा स्वत:वर खर्च न करता त्यातून गणेशमंडळाचा खर्च भागवा.’ विशेष म्हणजे आमदार-खासदारांच्या या सल्ल्यांना उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

जुगाराऐवजी कॅरम, सापशिडी, बुद्धिबळ, चायनीज ट्रेकर, लुडो, असे खेळ खेळावेत. गाणी ऐकावीत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत जुगाराकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.

– यशस्वी यादव,

पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ई-कुबेर’प्रणालीमुळे उपकोषागार कार्यालयाचे कामकाज जलद, सुलभ, सुरक्षित, विश्वासार्ह होण्यास मदत होईल! – अजित पवार

News Desk

बैलगाडी शर्यतीवर बंदीच!

News Desk

‘या’ कारणासाठी शिवेंद्रराजे घेतली शरद पवारांची भेट

News Desk