HW News Marathi
मनोरंजन

लोपामुद्राने बनविला मातीचा गणपती!

नागपूर : मॉडेल – अभिनेत्री आणि अनेक सौंदर्य स्पर्धा गाजवणारी सौंदर्यवती लोपामुद्रा राऊत खास गणेशोत्सवासाठी नागपुरात तिच्या घरी आली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी लोपामुद्रा स्वत: हाताने गणपती तयार केला असून आज त्यांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर स्वतः तयार केलेल्या मोदकाचा नैवेद्यदेखील ती या होममेड बाप्पाला दाखवणार आहे.

‘बिग बॉस’ स्पर्धेत उपविजेती ठरल्यानंतर ती पहिल्यांदाच नागपुरातल्या तिच्या घरी आली आहे. ‘मागील वर्षी सौंदर्य स्पर्धेसाठी जायचे असल्यामुळे आणि त्यानंतर लगेच बिग बॉसमध्ये प्रवेश झाल्यामुळे मला घरी गणेशोत्सवासाठी येता आले नव्हते. मनात त्याबद्दल रुखरुख होती. पण यंदा दोन दिवसांसाठी आले आहे. मागील पन्नास वर्षांपासून माझे वडील हाताने गणपती तयार करून त्याची प्रतिष्ठापना करतात. त्यांना मुलगा नसल्यामुळे यंदा मीच ही परंपरा पुढे नेणार आहे, असे लोपाने सांगितले. ‘लहानपणापासून खूप लाडात वाढल्यामुळे माझ्यावर कधी स्वयंपाक घरात जायची वेळच आली नव्हती. पण जेव्हा बिग बॉसमध्ये दहा बारा जणांसाठी स्वयंपाक बनवायला लागायचा तेव्हा आईबाबा खूप चिडवायचे. आता मला बऱ्यापैकी स्वयंपाक करता यायला लागलेला आहे. त्यामुळे बाप्पासाठी नैवेद्य मीच तयार करणार आहे.’ लोपामुद्राच्या वडिलांनी पुलगावजवळ एका छोट्या गावात त्यांच्या गुरूंचे एक मंदिर उभारले असून त्यालाही ती भेट देणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऋषी कपूर यांच्या निधनाने निखळ आनंद देणारे हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्वे हरपले !

News Desk

सईच्या आयुष्यावरची थरारकथा ‘डेट विथ सई’  

News Desk

बिग बींचा शेतकरी व शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

News Desk