HW News Marathi
मुंबई

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला यंदा ४० किलो सोन्याचे दागिने!

पुणे – उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तब्बल ४० किलो सोन्याचे दागिने वेऊन भक्तांच्या भेटीला येणार आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्ट यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करीतआहे. त्यानिमित्त गेल्या १५ वर्षांत देणगी स्वरुपात जमा झालेल्या सोन्यापासून हे दागिने तयार करण्यात आले आहेत. मंगळवारी लक्ष्मी रोडवरील गाडगीळ ज्वेलर्समध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यातआलेले हे दागिने पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवनिमित्त हे नवीन दागिने घडविण्यात आले. यात हत्ती शिल्प,मोरतुरे आणि नवग्रहांच्या समावेशासह ७ ते १० हजार खडयांची सजावट असलेला ९.५ किलोचा मुकुट, रत्नजडित खड्यांनी तयार केलेला ७०० ग्रॅमचा शुंडहार, सूर्याच्या किरणांचा आभास निर्माण करणारे २ किलो वजनाचे कान आणि तब्बल ४ हजार सुवर्णटिकल्यांनी मिनाकाम करुन चंद्रकोरीचा आभास निर्मिती करणारा २.५ किलोचा अंगरखा बाप्पाला अर्पण करण्यात येणार आहे. ४० कारागिरांनी या दागिन्यांसाठी ५ महिन्यांपासून मेहनत घेतली. त्यांना तब्बल सव्वा कोटी रुपयांची मजुरी देण्यात आली. मात्र कारागिरांनी मोठ्या भक्तिभावाने ही मजुरी नाकारली, अशी माहितीमंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

News Desk

लोअर परळ पूल तोडण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात

swarit

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Chetan Kirdat