HW News Marathi
देश / विदेश

उपाचारासाठी ५० रुपये कमी पडल्याने बाळाचा मृत्यू

रांची – सिटीस्कॅन करण्यासाठी केवळ ५० रुपये कमी पडल्याने एक तान्हुले बाळ दगावल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना येथे घडली. रांचीच्या राजेंद्र इन्सिटट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यारुग्णालयात नुकत्याच घडलेल्या या प्रकारला रुग्णालय प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप बाळाचे वडिल संतोष कुमार यांनी केला आहे.

आरआयएमएस रुग्णालयात सिटी स्कॅनची फी १३५० रूपये आहे, संतोष कुमार यांच्याकडे १३०० रुपये होते. ते त्यांनी भरलेही. मात्र पुढचे ५० रुपये भरल्याशिवाय आम्ही सिटी स्कॅन करणार नाही, अशी आडमुठी भूमिका सिटी स्कॅन लॅबच्या कर्मचाऱ्यांनी घेतली. सिटी स्कॅन न होऊ शकल्याने बाळ दगावले.

डोक्याला जखम झाल्याने कुमार यांनी बाळाला रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनीत्याचा सिटी स्कॅन करण्यास सल्ला दिला. मात्र केवळ ५० रुपये कमी पडल्याने लॅब् कर्मचाऱ्यांनीटेस्ट न करताच कुमार यांना तिथून पाठवून दिलं.त्यामुळे बाळाला उपचार मिळू शकले नाही आणि तो दगावला. कर्मचाऱ्यांच्या या माणुसकी शून्य वर्तनाची गंभीर दखल घेण्याची मागणी कुमार यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन दिग्गजांवर आज होणार अंत्यसंस्कार

swarit

“मोदीसाहेब, पश्चिम बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल – डिझेलवर का काढताय?”,रुपाली चाकणकरांचा सवाल

News Desk

चारित्र्यहनन करुन आरक्षणाच्या मुळ मुद्याला बगल देता येणार नाही- हार्दिक पटेल

News Desk