HW News Marathi
महाराष्ट्र

लिंग बदलेले जोडपे विवाहबद्ध !

मुंबई – शरीराने पुरुष पण मनाने महिला आणि शरीराने महिला पण मनाने पुरुष असलेल्या दोघांनी नुकतीच लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली. शस्त्रक्रियेसाठी आपापल्या गावाहून दोन – तीन वर्षांपूर्वी मुंबईत आलेले दोघे नपसूक एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आता लवकरच ते जन्मभराच्या विवाह बंधनात अडकणार आहेत.

आरव अपुकुट्टन (46) याचा जन्म स्त्री म्हणून झाला व तिचं नाव होतं बिंदू. तसेच सुकन्या कृष्णन (22)हिचा जन्म पुरूष म्हणून झाला होता, नाव त्याचं चंदू होतं.आंतरिक प्रेरणेने त्यांना लिंगबदल करून घेण्याची इच्छा झाली आणि ते मुंबईत आले. लिंगबदलाच्या उपचारांदरम्यानच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.आता त्यांच्यातील तीचा तो होण्याची आणि त्याचा ती होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आरव व सुकन्या येत्या महिन्यात लग्न करणार आहेत.

रुग्णालयात डॉक्टराच्या भेटीसाठी रांगेत ताटकळताना आम्ही घरच्यांशी फोनवर मल्याळी भाषेत बोलायचो. त्यावरून आम्ही दोघेही मल्याळी असल्याचे एकमेकांना कळले आणि संवादाला सुरुवात झाली. यातूनच एकीएके लिंगबदल प्रक्रिया सुरू असताना आमच्यातले प्रेमही खुलू लागले, अशी आठवण सुकन्याने सांगितली. आता आम्ही मंदिरामध्ये लग्न करण्याचा विचार करत असल्याचे आरवने सांगितले. त्याला दोन्ही कुटुंबांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मूल दत्तक घेण्याचा विचारही त्यांनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“इम्पेरिकल डेटा केंद्रानेच दिला पाहीजे”, छगन भुजबळांची माहिती

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चांगलं काम सुरु आहे | अजित पवार 

News Desk

शरद पवारांवर ८-१० दिवसांत आणखी एक शस्त्रक्रिया होणार!

News Desk