HW News Marathi
महाराष्ट्र

पाच वर्षांच्या बालिकेचा ‘कळसुबाई’वर झेंडा

नाशिक : राज्यातील सर्वांत उंच शिखर, असा औकीक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील

सुमारे साडेपाच हजार फूट उंचीचे कळसुबाई शिखरनाशिकच्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीने सर केले आहे.अदिबा खान असे तिचा नाव असून या भीम प्रराक्रमाबद्दल नुकतेच तिला विशाखापट्टणमच्या वज्र वर्ल्ड रिकॉर्ड या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनीही तिचा प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.

नाशिकमधील लिटर किंग्डम या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सिनियर केजीमध्ये शिकणाऱ्या अदिबा आरिफ खान या विद्यार्थिनीने २६ जानेवारी रोजीप्रजासत्ताक दिनाला ४० गिर्यारोहकांच्या समूहासोबत हे शिखर सर केले होते. नुकतेच त्यानिमित्त आताआंध्रप्रदेशमधील विशाखापटट्णमच्या विविध विश्वविक्रमांची नोंद करणाऱ्या ‘वज्र वर्ल्ड रिकॉर्ड’ या संस्थेनेही अदिबाला पुरस्काराने सन्मानित केले आहे.

भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय,नेहरू युवा केंद्र नाशिक व मार्क मार्शल आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी रोजी कळसुबाई शिखरावरध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात४०गिर्यारोहकांसोबत अदिबाही सहभागी झाली होती आणि कुणाचीही मदत न घेता केवळ गिर्यारोहकांच्या मार्गदर्शनाखाली तीन तासांमध्ये तिने कळसुबाई शिखराची चढाई पूर्ण करत तिरंग्याला सलामी दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांना आता कुणीच वाचवू शकत नाही, किरीट सोमय्या यांचा इशारा

News Desk

मुख्यमंत्री पुन्हा एकदा घेणार श्रीरामांच दर्शन

swarit

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, उद्धव ठाकरेंची ठाम भूमिका

News Desk