HW News Marathi
महाराष्ट्र

महाबीजने कमावले ७० कोटी

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) विश्वासार्हतेमुळे गतवर्षी संस्थेला ७० कोटी रुपये नफा झाला आहे. तसेच यंदाही संस्थेने तब्बल ७२५ कोटी ३५ लाख रुपयांच्या बियाणे विक्रीचा व्यवसाय केला आहे. देशातील सर्वच बियाणे महामंडळाला याबाबतीत महाबीजने मागे टाकले आहे.

खासगी कंपन्यांच्या बियाणे दराच्या स्पर्धेत शेतकºयांना दिलासा देण्यासाठी नवे बियाणे संशोधन केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार व किफायतशीर बियाणे उपलब्ध होण्यासाठी २८ एप्रिल १९७६ रोजी महाबीजची स्थापना करण्यात आली आहे. खासगी कंपन्यांच्या वाढीव बियाणे दरावर यामुळे काही प्रमाणात अंकुश लागला आहे. राज्यातील शेतकºयांच्या गरजेनुसार हवामानातील बदलाला पुरक उच्च दर्जाचे संकरित व सुधारित संशोधित वाण विकसित करू न दिले आहे. याच उद्देशाने १९९२ मध्ये महामंडळाने संशोधन व विकास विभागाची स्थापना केली आहे. आतापर्यंत संकरित ज्वारी, सूर्यफूल, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग,उडीद व भाजीपाला या पिकांच्या संशोधनास प्राधान्य दिले असून, शेतकºयांना हे बियाणे उपलब्ध करू न दिले आहे.

यामध्ये संकरित ज्वारी महाबीज -७, मूग- उत्कर्षा, संकरित बाजरी महाबीज – १००५, संकरित मका उदय हे वाण भारत सरकारने अधिसुचित केले आहेत. तसेच संकरित कपाशी वाणामध्ये बी.टी. जनूक टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. संकरित कपाशी पीकेव्ही हाय-२, बीजी-२ व एनएचएच-४४, बीजी-२ या वाणांना कृषी विभाग व भारत सरकारने मराठवाडा विभागाकरिता कोरडवाहू लागवडीस नुकतीच मान्यता दिली आहे. यातील पीकेव्ही हाय-२ व वरील इतर वाणांची संपूर्ण राज्यात लागवड करण्याकरिता कृषी विभाग व भारत सरकारकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

कोट्यवधींची वार्षिक उलाढाल!

मागील पाच वर्षांतील आकडेवारीकडे बघितल्यास २०१२-१३ मध्ये ५१३.१३ कोटी वार्षिक उलाढाल झाली होती. तसेच २०१३-१४ मध्ये ५३२.५१ कोटी, २०१४-१५ ची उलाढाल ३४१.५० कोटी, २०१५-१६ मध्ये ४७२.१४ कोटी रुपये, २०१६-१७ मध्ये ६४४.६६ कोटी, तर चालू २०१७-१८ यावर्षी ७२५.३५ कोटी रुपयांची बियाणे विक्रीची उलढाल झाली आहे. प्रत्येकवर्षी महाबीजला नफा झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले कराल, तर लष्कराच्या मदतीची वेळ येऊ नका !

swarit

मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या ६५० कोटीच्या निधीस मंजुरी – अजित पवार

Aprna

महाराष्ट्रात जरी आघाडीचं सरकार असलं तरी बाळासाहेब थोरातांना बळकट करायचे आहे, पृथ्वीराज चव्हाणांचे सुचक वक्तव्य

News Desk