HW News Marathi
देश / विदेश

… म्हणून चक्क दलित महिलेचे नाक कापले

नवी दिल्ली – सवर्णीयांनी सांगितलेले काम नाकारलं म्हणून एका दलित महिलेचे चक्क नाक कापण्यात आल्याचा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार मध्य प्रदेशात घडला. इतकेच नव्हे तर या सवर्णीय मग्रूर पितापुत्राने संबंधित महिलेला आणि तिच्या पतीला अमानुषपणे मारहाणही केली आहे. सागर जिल्ह्यातील रेंझवा गावात घडलेल्या या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे.

सोमवारी नरेंद्र सिंह (वय 32 वर्ष) आणि त्याचे वडील साहेब सिंहनं राघवेंद्र धानक (वय 40 वर्ष) आणि त्यांची पत्नी जानकी यांना आपल्या घरी येऊन काम करण्यास सांगितले होते. मात्र, राघवेंद्र यांनी काम करण्यास नकार दिला. राघवेंद्र यांनी काम करण्यास नकार दिला म्हणून भडकलेल्या नराधम बापलेकांनी दोघांनाही बेदम मारहाण केली.

यात जखमी झालेल्या पतीला रुग्णालयात घेऊन जात असताना नरेंद्र आणि साहेबनं जानकीला रस्त्यात गाठलं व तिचं नाक कापले. जनकीने महिला आयोगाच्या अध्यक्षा कडे हे प्रकरण मांडत आरोपींना शिक्षा करण्याची मागणी केली. त्यावेळी हा धक्कादायक व गंभीर प्रकार समोर आला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दिल्लीला ७०० मेट्रिक टन ॲाक्सिजन पुरवा’ सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला फटकारलं !

News Desk

तेलंगणा विधानसभेच्या मतदानाला सुरुवात

News Desk

देशाची निर्यात वृद्धी होण्यासाठी लॉजिस्टीक खर्च कमी करण्याची आवश्यकता – नितीन गडकरी

News Desk