HW News Marathi
मुंबई

शिक्षणमंत्र्यांवर मानसिक छळाचा गुन्हा नोंदवा – आदित्य ठाकरे

मुंबई : निकाल रखडल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकांच्या पुढील शिक्षणाच्या संधी हुकल्या आहेत. विद्यार्थी पालकांना ज्या मानसिक तणावातून जावे लागत आहे, त्याला शिक्षणमंत्री विनोद तावडे हेच जबाबदार असून त्यांच्यावर मानसिक छळाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, असेही ठाकरे शनिवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.

ज्या खासगी कंपनीला शिक्षणमंत्र्यांची निकालाचे कॉन्ट्रॅक्ट दिले त्याची पारदर्शीपणे चौकशी व्हायला हवी. ऑनलाइन अ‍ॅडमिशन बंद करा, अशी मागणी आपण सगळ्यात आधी केली होती, पण ती यांनी मान्य केली नाही. आज कर्जमाफीसाठी शेतकरी आणि निकालासाठी विद्यार्थी सरकारच्या दुराग्रही नलान हट्टापुढे हतबल झाल्याचेही ठाकरे म्हणाले.

यापेक्षा आधीचे सरकार चांगले होते. त्यांच्या काळात निकालांचे घोळ तरी झाले नव्हते, असाही टोला त्यांनी लगावला. रवींद्र वायकर हे शिक्षण राज्यमंत्री शिवसेनेचे आहेत त्याचे काय, असे विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार नाहीत. सगळ्या बैठकांचे मिनिट्स काढून पाहा, आमच्या राज्यमंत्र्यांनी वेळोवेळी सूचना केल्या, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असे सांगत त्यांनी स्वत:ची जबाबदारी झटकली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उल्हानगरमध्ये भोंदू बाबांना संतप्त नागरिकांनी झोडपले; चारही भोंदू पोलिसांच्या ताब्यात

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकच्या विलंबामुळे प्रवाशांचे हाल

News Desk

ब्रेकिंग | भिवंडीत ऑईल गोदामाला भीषण आग

News Desk