कन्नूर – अपघात होऊ नये म्हणून सर्वच राज्यांत दारू पिऊन वाहन चालविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पण केरळ सरकारने त्याच्याही दोन पावले पुढे जात दारू पिऊन प्रवास करण्यावरही बंदी घातली आहे. रिपब्लिक वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार मद्याच्या नशेत असलेल्या प्रवाशांना गाडीमध्ये बसवू नये, असे आदेश सरकारने सर्व वाहन चालकांना दिले आहेत.
केरळ सरकारने दिलेले आदेश टॅक्सी, ओला आणि उबरच्या चालकांना लागू आहेत. त्यानुसार नियमांचे उल्लंघन केल्यास चालकालाही शिक्षा होणार आहे. रस्ते सुरक्षेसंदर्भात आपण अत्यंत गंभीर असल्याचे केरळ सरकारनेया आदेशांत म्हटले आहे. मात्र स्थानिकांचा या निर्णयाला विरोध आहे. रात्रपाळीतून ओला आणि उबरचे ड्रायव्हर चांगली कमाई करतात. पब आणि बारच्या बाहेरुन ते मोठया प्रमाणावर प्रवाशांना पिकअप करतात. हा निर्णय त्यांच्या उत्पनावर परिणाम करणारा आहे. मात्र वाद होऊनही सरकार आपल्या निर्णयावर ठाम असून लवकरचत्याची कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.