HW News Marathi
मनोरंजन

बीग बी अमिताभ गोत्यात!

नवी दिल्ली – बॉलिवूडचा बीग बी अमिताभ बच्चन करचुकवेगिरीच्या प्रकरणात गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पनामा पेपर्स प्रकरणाच्या तपासात देशाच्या प्राप्तिकर विभागाने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे या प्रकरणात नावे पुढे आलेल्या अमिताभसह अन्य बड्या धेंडांवर गंडातर येणार आहे.

ब्रिटिश वर्जिन आइसलँडचा कॅरेबियाई द्वीप समूहातील टॅक्स हेवन (कर भरावा लागत नाही असा देश)देशांमध्ये समावेश होतो. पनामा पेपर्सच्या ३३ प्रकरणांतखटले दाखल करण्यात आले आहेत. सध्या अन्यदेशांकडून माहिती गोळा करीत असल्याचे संबंधित तपासअधिका-याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितल्याचे टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने म्हटले आहे.

पनामा पेपर प्रकरणामुळे पाकिस्तानात नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर भारतातील प्राप्तिकर विभाग तपासात चालढकल करीत असल्याची टीका होत होती. त्यामुळे याचा तपास आता अधिक आक्रमकपणे सुरू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयुष्यमान आणि भूमीची कंडोम राइड

News Desk

आगमन बाप्पाचे | माटुंग्याच्या बाजारपेठेत तामिळनाडूचे बाप्पा

News Desk

पिया’च्या नटखट पहरेदारला रोखण्याची मागणी

News Desk