HW News Marathi
राजकारण

देशभरात ‘या’ सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई | देशभरात आज (२९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह देशभरात ९ राज्यातील ७१ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. हा टप्पा महाराष्ट्रातील लोकसभेचा चौथा आणि अंतिम टप्पा आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात अनेक सेलिब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे, बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा, बॉलिवूड अभिनेता अमीर खान, बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांसह अनेक सेलिब्रिटींनी मतदान केले आहे.

  • ‘छत्रपती संभाजी’ मालिकेमुळे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने बजावला मतदानाचा हक्क

  • बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी त्यांच्या कन्या इशा आणि अहाना देओल यांच्यासह बजावला मतदानाचा हक्क

  • बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने बजावला मतदानाचा हक्क

  • मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • बिग बी अमिताभ बच्चन यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

  • प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिने बजावला मतदानाचा हक्क
  • मराठी अभिनेता भूषण प्रधान यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने केले मतदान

  • बॉलिवूड अभिनेता आर.माधवन याने बजावला मतदानाचा हक्क

  • बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिने केले मतदान

  • प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने बजावला मतदानाचा हक्क

  • काँग्रेसच्या उत्तर मुंबई मतदारसंघाच्या उमेदवार आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • जुहू येथे ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी केले मतदान

  • प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

  • वांद्रे येथे ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट यांनी केले मतदान

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी लग्नावरून आदित्य ठाकरेंची घेतली फिरकी; म्हणाले…

Aprna

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिला ‘आरसा’

News Desk

राज्यातील सत्तांतरावर पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर होणार

Aprna