HW News Marathi
महाराष्ट्र

सोलापुरात डेंग्युचा दुसरा बळी

सोलापूर : पावसाळी वातावरण, आणि अन्य कारणांमुळे सोलापूर शहरात साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. डेंग्यु तर येथे गेल्या अनेक दिवसांपासून थैमान घालतो आहे. आठवड्याभरात डेंग्युने येथे आठ बळी घेतले आहे.

सुकन्या विवेक इंगळे या शाळकरी मुलीचा गुरुवारी डेंग्यूने बळी गेला होता, सोमवारी आणखीएका मुलगा डेंग्युने दगावला आहे. विकास शंकर गन्हावाले (१२, रा. विद्यानगर, काळभैरव मठाजवळ,सोलापूर) असे मृताचे नाव आहे. तसेच अन्य दोन जणांवर शासकीय रुग्णालयातील अतिदक्षताविभागामध्ये उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपासून शहर-जिल्ह्यात सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दवाखान्यामध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ दिसू लागली आहे. प्राथमिक केंद्र,उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालयातील आरोग्य विभागाना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीशेजारी महापालिकेचे स्टॉल्स तैनात!

News Desk

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी… महिलेवर गँगरेप करणार्‍या आरोपींना कडक शिक्षा द्या – जयंत पाटील

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरक्षण मिळावे या मताचे नाहीत – नारायण राणे

News Desk