HW News Marathi
मुंबई

मुंबई- पुणे मार्गावर पेट्रोल टँकरला आग

पुणे – जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर एक पेट्रोल टँकरला अपघातानंतर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. रसायनीजवळच्या भोकरपाडा येथे रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला होता. काही वेळासाठी या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती.

वाहतूक खोळंब्यामुळे या मार्गावरची वाहतूक सावलामार्गे वळविण्यात आली होती. दरम्यान, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळ्याजवळील वलवण व कुणेगाव पूलांसह दस्तुरी गावच्या हद्दीत अनेक ठिकाणी पावसामुळे मोठमोठे खड्डे पडून मार्गाची चाळण झाल्याने जलद व सुरक्षित प्रवासासाठी ओळखला जाणारा मार्ग सध्या असुरक्षित बनला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्जमाफीची नवी फॅशन आलीय – व्यंकय्या नायडू

News Desk

रविवारी बाहेर जाताय… सावधान !

News Desk

पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

News Desk