HW News Marathi
शिक्षण

मेडशी जिल्हा परिषद शाळेत संगणक व इ लर्निंग लोकार्पण सोहळा

विनोद तायडे

मालेगाव -रिसोड तालुक्यातील विध्यार्थ्याना डिजिटल युगात शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी संगणक संच व इ लर्निंग भेट देण्यासाठी बेटर टुमोरो फाऊंडेशन चे अध्यक्ष वामन सानप पुढाकार घेतला आहे .

वाशिम जिल्हयातील 150 वर्षांपूर्वीची जिल्हापरिषद शाळा ओस पडत चालली आहे . शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी गावकरी उदासिन असताना बेटर टुमोरो फाऊंडेशन ने पुढाकार घेतला आहे शाळेला संगणक संच व इ लर्निंग लोकार्पण सोहळा सरपंच रेखा मेटांगे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडला . याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेटर फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा उद्योजक अभियंता वामन सानप यांची उपस्थिती लाभली .भारतीय युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रणजित मेडशिकर ,तंटामुक्त समिती अध्यक्ष विनोद तायडे , शाळा सुधार समिती अध्यक्षा रंजिता साठे उपसरपंच मूलचंद चव्हाण ,डॉ सतीश बाहेती,सुभाष तायडे , जलसम्राट दीपक वानखडे पत्रकार अजय चोथमल,केंद्रप्रमुख रंगलाल राठोड ,मुख्यध्यापक लठाळ,वंदना तायडे, राठोड,खंडागळे आदी मुख्याध्यापकांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आली. मान्यवरांचा सत्कारही वृक्ष देऊन करण्यात आला.कार्यकमापासून प्रेरणा घेऊन येथील उदोजक डॉ सतीश बाहेती यानी शाळेची एक खोली डिजिटल करण्याचे घोषित केल्याने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक लठाळ यांनी केले . वामन सानप ,रेखा मेटांगे , रणजित मेडशिकर ,विनोद तायडे ,दिपक वानखडे यांची समायोजित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन घुगे तर आभार सुनंदा दराडे यांनी मानले

विनोद तायडे वाशिम

8888277765

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसेवा पूर्व परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्माक आदेश    

News Desk

…आता महाविद्यालयात येऊन भगवद्‌गीता वाचायची ?

swarit

अनुदान, बीजभांडवल योजनेचा बँकेमार्फत लाभ देण्यासाठी अर्ज करा

News Desk