HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर : हिज्बुल मुजाहिदीनया दहशतवादी संघटनेच्याका अतिरेक्याचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला गुरुवारी मध्यरात्री यश आले. या वेळी झालेल्या चकमकी अन्य एकाचाही मृत्यू झाला; मात्र तो दहशतवादी आहे अथवा नाही, यासंदर्भात अधिक माहिती समजू शकली नाही. दरम्यान, या चकमकीमध्ये राजस्थान रायफल्सचा एक जवान जखमी झाला आहे.

यावर निसार शेरगुजरी असे ठार झालेल्या अतिरेक्याचे नाव आहे. ठार झालेला दुसरा इसम त्या भागामध्ये दुचाकीवरून जात होता. दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये तो इसम सापडला.

संशयित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अनंतनाग जिल्ह्यातील काही भागांमध्ये काल रात्रीपासून लष्कराने शोधमोहीम हाती घेतली होती. या भागात तीन दहशतवादी दिसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी लष्कराच्या तुकडीवर गोळीबार केला. त्याला जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात शेरगुजरी ठार झाला. पण अन्य दोन दहशतवादी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. घटनास्थळी लष्कराला एक एसएलआर रायफल, दोन मॅगझिन्स, चाळीस काडतुसे आणि चिनी बनावटीचा एक बॉम्ब सापडला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाईनच्या तागापासून मोदी जॅकेट

News Desk

मराठा आरक्षण | ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करा, राज्य सरकारची मोदींकडे मागणी

News Desk

केंद्राची रिझर्व्ह बँकेकडे ३ लाख ६० हजार कोटींची मागणी, बँकेचा स्पष्ट नकार

Gauri Tilekar