कोलंबो | श्रीलंकेत ईस्टर संडेला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरले. यानंतर आज (२५ एप्रिल) पुन्हा एकदा श्रीलंकेची राजधानी कोलंबोपासून ४० किलोमीटर दूरवर असलेल्या पुगोडा शहरात दंडाधिकाऱ्या न्यायालयाच्या पाठीमागे स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहेत.
Reuters: Blast heard in Pugoda town, 40 km east of Sri Lankan capital Colombo
— ANI (@ANI) April 25, 2019
इस्लामिक स्टेटने स्वीकारली जबाबदारी
श्रीलंकेतील स्थानिक इस्लामी कट्टरवादी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) हिचा या साखळी बॉम्बस्फोटांमागे हात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, कुठल्याही संघटनेने आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. अखेरीस इस्लामिक स्टेटने आज या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.