HW News Marathi
राजकारण

प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली | प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आणि जगभरात पसरलेल्या सलून चेनचे मालक जावेद हबीब यांनी आज (२२ एप्रिल) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने जावेद हबीब यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. ”आतापर्यंत मी केसांचा चौकीदार होतो, आज मी देशाचा चौकीदार झालो आहे’,’ भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जावेद हबीब म्हणाले.

जावेद हबीब यांनी लंडन येथील ‘मॅरिस स्कूल ऑफ हेअर ड्रेसिंग’ आणि ‘लंडन स्कूल ऑफ आर्ट अ‍ॅण्ड फॅशन’मधून ‘आर्ट अ‍ॅण्ड सायन्स ऑफ हेअर स्टाइलिंग अ‍ॅण्ड ग्रूमिंग’चं त्यांनी शिक्षण घेतले आहे. देशभरात जावेद हबीब यांच्या मालकीची अनेक सलून्स आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात उदयनराजे भोसले अनुपस्थित; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

२०१४ मध्ये अशा झाल्या होत्या लोकसभा निवडणुका

News Desk

तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव मागे

News Desk