HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई महापालिका झाली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी!

घाटकोपरमध्ये २० बळी जात असताना पहारेकरी झोपले होते का?

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा हल्लाबोल

मुंबई: महानगर पालिका प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असून, बेकायदेशीर बांधकामामुळे घाटकोपरमधील साईदर्शन इमारत कोसळून 17बळी जात असताना पहारेकरी झोपले होते का, अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

घाटकोपर परिसरातील इमारत दुर्घटना प्रकरणी विधानसभेत मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर ते बोलत होते. बुधवारी सकाळी विखे पाटील यांनी या गंभीर प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधून स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. दुपारी या प्रस्तावावर बोलताना त्यांनी मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराचा कठोर शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले की, मुंबई महापालिकेत बेकायदेशीर कामांना संरक्षण देणारी आणि त्यातून मलिदा लाटणारी एक यंत्रणा राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या संगनमतातून तयार झाली आहे. त्याची किंमत सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव देऊन चुकवावी लागत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BSNLच्या 4G अपग्रेडेशनसाठी काढलेल्या निविदा दूरसंचार मंत्रालयाने केल्या रद्द

News Desk

पालघरमधील ११ हॉटेल्स होम कोरोंटाईन करणाऱ्यांसाठी राखीव

swarit

“नितेश राणेंच्या आरोपांना आम्ही महत्व देत नाही” – अनिल परब

News Desk