मुंबई | दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने हा गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आयोगाने मिलिंद देवरा यांना दोन दिवसांपूर्वी नोटीस पाठविण्यात आले होते.
FIR registered against Congress candidate from South Mumbai Milind Deora under section 171 of IPC ( giving false statements for elections) and section 125 of the presentation of people's act ( promoting enmity between classes in connection with elections). (file pic) pic.twitter.com/vlGe3433kA
— ANI (@ANI) April 21, 2019
“शिवसेनेने काही वर्षांपूर्वी पर्युषण काळात जैन मंदिरासमोर मांसाहार शिजवत जैन धर्माचा अपमान केला होता,” असे विधान मिलिंद देवरा यांनी केले आहे. देवरा यांनी भुलेश्वर येथील भाषणादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केले होते. यानंत शिवसेनेने देवरा यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात खोटे वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणुकीदरम्यान दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मिलिंद देवरा यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा जैन कार्डचा वापर काँग्रेस करणार असल्याचे स्पष्ट झाले होते. दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून अरविंद सावंत निवडणुकीच्या रंगणात उतरले आहेत. दक्षिण मुंबईत जैन समाजाची मते महत्त्वाची आहेत. त्यामुळे जैन मते काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांनी प्रक्षोभक विधान करुन मते मिळविण्याचा केविळवाणा प्रयत्न केल्याचे शिवसेनेकडून आरोप होत होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.