HW News Marathi
राजकारण

काँग्रेसची ‘ठगमास्टर’ नावाने नवीन मोहीम

नवी दिल्ली | चौकीदारऐवजी आता ‘ठगमास्टर’ मध्य प्रदेशात संयुक्‍त मुख्य निवडणूक अधिकारी राजेश कौल यांनी भाजपच्या तक्रारीनंतर काँग्रेसला ‘चौकीदार चोर है’ या प्रचारावर बंदी आल्यानंतर काँग्रेसने आता सत्ताधार्‍यांविरोधात ‘ठगमास्टर’ नावाने नवीन मोहीम सुरू केली आहे. ‘चौकीदार चोर है’ मोहिमेवरील बंदी मध्य प्रदेशपुरती असली, तरी काँग्रेसने याबाबत अजिबात वेळ न दवडता राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना नव्या मोहिमेची टॅगलाईन ‘ठगमास्टर’ वळवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘महान ठग’ म्हणून प्रचार केला जात आहे. बुधवारी (१७ एप्रिल) मध्य प्रदेश भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेत काँग्रेसविरोधात तक्रार दाखल केली होती. यातक्रारीत भाजपने म्हटले होते की, भाजपच्या ‘मैं भी चौकीदार’ या मोहिमेची काँग्रेस मोडतोड करत आहे. ‘मैं भी चौकीदार’ या टॅगलाईनला निवडणूक आयोगाच्या मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटीने मान्यता दिली होती. तथापि, मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या पोस्टर्स, रेडिओ जिंगल्स, टीव्हीवरील जाहिरातींमध्ये ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा वापरलेली नाही.

कार्यकर्त्यांनी याच घोषणेवर तोंडी प्रचारात जास्त भर दिलेला जात आहे. राफेल करारातील कथित भ्रष्टाचाराविषयी राहुल गांधींनी ‘चौकीदार चोर है’ हे विधान केले होते आणि विविध सभांमध्ये त्यांनी सातत्याने या घोषणेचा वापर केला होता. गुजरातमधील तापी येथे झालेल्या सभेत शुक्रवारी (१९ एप्रिल) राहुल गांधी बोलायला उभे राहताच लोकांमधून ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या गेल्या होत्या. त्यावेळी राहुल यांनी मोदींना ‘ठगमास्टर’ म्हणण्याचे लोकांना आवाहन केले होते.

ऐसा ठगमास्टर काम का नाही

मध्य प्रदेशात काँगेसच्या नवीन थीमसाँगमध्ये नोटाबंदी आणि जीएसटीमुळे रोजगार नष्ट झाल्यावरून टीका केली आहे. या थीमसाँगची टॅगलाईन आहे, ‘ठग मास्टर से बचकर रहना’ तसेच ‘लोगों के रोजगार नाम के नही, ऐसा ठगमास्टर काम का नही,’ अशा या गाण्याचा ओळी आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मग दोन पक्षांतर करणाऱ्यांचे जुळाले असेल”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Aprna

विदर्भाच्या विकासाचा हा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरजच राहिली नाही !

News Desk

मुख्यमंत्र्यांची विखे-पाटील यांना अवमानता नोटीस

News Desk