नवी दिल्ली | सुपरस्टार रजनीकांत लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रजनीकांत यांनी आपण तयार असल्याचे सांगितले असून तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. रजनीकांत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीच्या कधीही घोषणा झाली तरी मी निवडणूक लढायला तयार आहे.”
Rajinikanth on being asked if he will contest state polls if AIADMK falls short of majority after assembly bypolls: Whenever it is announced I am ready. I will decide after May 23 #TamilNadu pic.twitter.com/mjfR10xeRg
— ANI (@ANI) April 19, 2019
रजनीकांत यांना पुन्हा सत्तेत येणार का? या प्रश्नावर रजनीकांत २३ मेची वाट बघू, असे म्हणाले. तसेच जर लोकसभा निवडणुकीबरोबर राज्यात होत असलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत अण्णा द्रमुकच्या अडचणी वाढल्या. तर आपण निवडणूक लढवायला तयार आहोत. मात्र, याचा निर्णय २३ मेनंतरच होईल, असेही ते म्हणाले.
तामिळनाडूत ३८ लोकसभा जागा आणि १८ विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान १८ एप्रिल रोजी पार पडले आहे. पोटनिवडणुकीतील १८ जागांचे मतदान राज्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण जर अण्णा द्रमुकला या जागांवर फटका बसला तर राज्यातील त्यांचे सरकार अडचणीत येऊ शकते. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाल २०२१ ला संपणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.