HW News Marathi
महाराष्ट्र

इव्हीएम हॅकचे निवडणूक आयोगाचा दावा फोल

बुलडाणा: येथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) फेरफार झाल्याची कबुली जिल्हा प्रशासनाने दिल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने इव्हीएम हॅक करण्याचे दिलेले आवाहन फोल ठरले आहे.

बुलढाण्यात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोणार तालुक्यातील सुलतानपूर गावात मतदानादरम्यान हा प्रकार घडला आहे. मतदार जेव्हा एका अपक्ष उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटन दाबत होते तेव्हा भाजपच्या कमळ या चिन्हासमोरील एलइडी बल्ब लागत असल्याचे समजते. याची माहिती निवडणूक अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांना दिली होती, याचा खुलासा माहिती अधिकाराच्या माध्यमातून झाला आहे.

लोणार तालुक्यातील सुल्तानपूर गावात असलेल्या मतदान केंद्र क्रमांक ५६ वर एका मतदाराने जेव्हा मशिनवरील यादीतील उमेदवार क्र. १ ला असलेल्या अपक्ष उमेदवाराच्या नावापुढील नारळ या चिन्हापुढील बटन दाबले तेव्हा क्रमांक ४ वर असलेल्या भाजपच्या उमेदवाराच्या नावासमोरील दिवा लागला, यावरून हे मत भाजप उमेदवाराला गेले होते. याप्रकरणी आर्श्चयाची बाब म्हणजे याची तक्रार करणाºया उमेदवार आशा जोरे यांनी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास याची तक्रार निवडणूक अधिकाºयांकडे केली होती. मात्र, अधिकाºयांनी त्यांची तक्रार घेण्यासच नकार दिला होता. मात्र, जेव्हा अनेक मतदारांनी याबाबत तक्रार केली तेव्हा निवडणूक अधिकाºयांनी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास याबाबत तक्रार घेतली. आणि कारवाई करण्याआधी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या सहमती घेतली. यानंतर लोणारच्या निवडणूक अधिकाºयंचे सहाय्यक स्वत: या केंद्रावर पोहोचले. त्यानंतर त्यांनीही याची पडताळणी करून खात्री करून घेतली. यामध्ये खरोखरच अपक्ष उमेदवाराचे मत हे भाजप उमेदवाराला जात होते. या निवडणूक क्षेत्रातून अनेक अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतर या केंद्रावरील मतदान रद्द करण्यात आले. मतदान केंद्र बंद करण्यात आले, फेरफार करण्यात आलेले ईव्हीएम मशिन सील करण्यात आले. त्यानंतर पयार्यी व्यवस्था करण्यात आलेले अतिरिक्त मशीन या ठिकाणी लावण्यात आले. मात्र, राजकिय पक्षांनी फेरमतदानाची मागणी केली, त्यामुळे येथील मतदान रद्द करून अखेर २१ फेब्रुवारीला फेरमतदान घेण्यात आले.

या प्रकारावरून ईव्हीएममध्ये फेरफार करता येणे शक्य असल्याचे गलगली यांनी म्हटले आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे असे प्रकार घडत असताना आणि त्यासाठी अनेक राजकीय पक्षांकडून ईव्हीएमसोबतच्या फेरफाराला आव्हान देऊनही निवडणूक आयोगाने नेहमीच अशा प्रकारच्या फेरफाराची शक्यता नाकारली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, मात्र बेशिस्तपणा खपवून घेणार नाही!”- अनिल परब

News Desk

अवैध धंदे बोकाळल्याने महिला संतप्त

News Desk

MBBS च्या परीक्षा जुन महिन्यात होणार!

News Desk