HW News Marathi
देश / विदेश

युद्धासाठी पुरेसा दारूगोळा कुठे आहे, कॅगच्या अहवालाने खळबळ

नवी दिल्लीः चीन आणि पाकिस्तानबरोबर भारताच्या संबंधात गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. याच दरम्यान, भारताचे नियंत्रक- महालेखापरीक्षकांनी (कॅग) दिलेल्या अहवालाने मात्र सर्वांचीच झोप उडाली आहे. भारतीय लष्कराकडे अवघे १० दिवस पुरतील इतकाच दारूगोळा असल्याचा अहवाल कॅगने संसदेत सादर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सीमेवर तणाव सुरू असतानाच आलेला हा अहवाल भारतीयांच्या दृष्टीने चिंतेत टाकणारा विषय आहे.

लष्कराच्या मुख्यालयाने वर्ष २००९ ते २०१३ या कालावधीत सुरू केलेली खरेदी प्रक्रियेतील जानेवारी २०१७ पर्यंत प्रलंबित होती. वर्ष २०१३ पासून ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाकडून पुरवण्यात येणाऱ्या दारूगोळाच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधण्यात आले. परंतु, यात विशेष काही सुधारणा झाली नाही. उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण करण्यातही अपयश आले. नाकारण्यात आलेले किंवा आवश्यक नसलेला पण चांगला दारूगोळा हटवण्याचा किंवा तो दुरूस्त करण्याचाही प्रयत्न झाला नाही. दारूगोळा डेपोत अग्निशमन कर्मचाऱ्यांचीही कमतरता असून अपघातांचाही धोका राहिला, असे कॅगने संसदेत सादर केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळ माझ्यासाठी वाराणसी ऐवढेच महत्त्वाचे | पंतप्रधान मोदी

News Desk

वा रे केजरीवाल…केजरीवाल सरकारची कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा खटला चालवण्यास मंजुरी ..

Arati More

“वाह रे मोदी तेरा खेल”; इंधन दरवाढीविरोधात युवा काँग्रेस आक्रमक

News Desk