HW News Marathi
राजकारण

वंचित बहुजन आघाडीचे बटण दाबले तरीही भाजपलाच मत ?

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे बटण दाबले तरीही भाजपलाच मत जात असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केला आहे. कपबशीच्या चिन्हासमोरचे बटण दाबले तरीही कमळालाच मत जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी केला आहे. देशभरात आज (१८ एप्रिल) लोकसभा निवडणुकांसाठीचा दुसरा टप्पा पार पडत आहे. ग्रामीण आणि शहरी भाग मिळून एकूण ३५ ठिकाणी हा प्रकार घडल्याचा दावा देखील सुजात यांनी केला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोल्यातून लढवत आहेत

सकाळपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रातील मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बाब समोर आली. अकोला, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड येथील मतदान केंद्रांमध्ये तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत अडथळे आले. वंचित बहुजन आघाडीला मतदान केले तरी भाजपलाच मत जात असल्याचे अनेक लोकांकडून आपल्याला सांगण्यात येत असल्याचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले आहे. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी देखील काँग्रेसला मतदान केल्यास भाजपला मतदान होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी ईव्हीएममधील बिघाडाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. “एकाही मतदाराची तक्रार नाही. उमेदवारांच्या तक्रारीत तथ्य नाही. चुकीची माहिती पसरवू नका. २७ ठिकाणी एव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड असला तरीही मशिन्स बदलली जात आहेत. कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही”, असेही जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानला ठोकून काढा! ठोकून काढा!!

News Desk

पश्चिम बंगालमध्ये भाजपला विजयी रॅली काढू देणार नाही !

News Desk

किती दलित, आदिवासी, मुस्लिमांना भारतरत्न मिळाले ?

News Desk