HW News Marathi
राजकारण

आधी भाजपने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यांसाठी केलेल्या खर्चाचा तपशील द्यावा !

मुंबई | “भाजपने जनतेला आधी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यांसाठी केलेल्या खर्चाचा तपशील द्यावा. भाजप नेत्यांनी राज ठाकरेंच्या सभांचा धसका घेतला आहे. राज यांच्या प्रभावी भाषणाने भाजपला त्याचा फटका बसेल या विचाराने विनोद तावडेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली”, असा टोला मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी लगावला आहे.“राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च नेमका कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविला गेला पाहिजे याची माहिती निवडणुक आयोगाने जनतेला द्यावी अशी मागणी आम्ही करणार आहोत”, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर किल्लेदार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“राज ठाकरे हे कोणत्याही पक्षाचा किंवा उमेदवाराचा प्रचार करत नाहीत. ते केवळ जाहीर सभांच्या माध्यमातून पंतप्रधानाबद्दल आपले मत मांडत आहेत. त्यांना आपले मत मांडण्याचा देखील अधिकार नाही का ?”, असा सवाल देखील किल्लेदार यांनी केला आहे. “पंतप्रधान मोदी यांनी देखील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मणिपूर अशा विविध राज्यांचा दौरा केला आहे. विनोद तावडे मोदींच्या या सर्व दौऱ्यांच्या खर्च तपशील देऊ शकतील ?, असा सवाल किल्लेदार यांनी यावेळी विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बलात्कारी राज बल्लभ निर्दोष, शिक्षा हा यादवांचा अपमान, राबडी देवींचे अजब वक्तव्य

News Desk

EXIT POLL : मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये कडवी टक्कर

News Desk

एका बापाचे असाल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा! – संजय राऊत

Aprna