HW News Marathi
राजकारण

माझ्या जीवाला धोका, पोलीस संरक्षण द्यावे !

मुंबई | भाजपच्या कार्यकर्त्यांनी बोरिवलीत काँग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याशी असभ्य वर्तन केल्याची बाब उघड झाली आहे. उर्मिला मातोंडकर या आज (१५ एप्रिल) सकाळी बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ प्रचार करत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी अश्लील नृत्य करत ‘मोदी मोदी’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील एकमेकांना भिडले. या दरम्यान एक महिला प्रवासी जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे.

“हा संपूर्ण प्रकार भीती पसरविण्यासाठी केला जात आहे. ही केवळ सुरुवात आहे. या प्रकरणाला आणखी हिंसक वळण लागेल. मी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे माझ्या जीवाला धोका असल्याने मी पोलीस संरक्षणासाठी देखील मागणी केली आहे”, असेही उर्मिला मातोंडकर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी पोलिसांत या संपूर्ण प्रकारची तक्रार दाखल केली असून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत उर्मिला यांनी पोलीस संरक्षण मिळण्याचीही मागणी केली आहे. उर्मिला मातोंडकर बोरिवली स्थानकाच्या परिसरात प्रचार करत असताना ८ ते १० जणांनी येऊन उर्मिला यांच्यासमोर उभे राहून अश्लील नृत्य करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे या कार्यकर्त्यांनी ‘मोदी मोदी’च्या घोषणा देखील दिल्या. यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MarathaReservation : आरक्षणाआधीच भाजपला श्रेय लाटण्याची घाई

News Desk

#LokSabhaElections2019 : पाटीदार सामाजाचे नेते हार्दिक पटेल आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

News Desk

…तर मी शहांना भेटायला गेल्याच्या बातम्या येतील !

News Desk