HW News Marathi
क्राइम

अभिनेत्री कृतिका चौधरी हिच्या हत्येचा तपास करण्यात एक महिन्यानंतर पोलिसांना यश

मुंबई- अभिनेत्री कृतिका चौधरी हिच्या हत्येचा तपास करण्यात एक महिन्यानंतर पोलिसांना यश आले आहे. पैशाच्या देवाण-घेवाणीतून कृतिकाचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी या प्रकरणी पनवेलमधून दोघांना ताब्यात घेतले आहे.

कृतिकाची हत्या झाली त्या रात्री दोघे तिच्या घरीच होते. पैशाच्या देवाण घेवाण करण्यासाठी ते कृतिकाच्या घरी गेल्याचे दोघांनी कबूल केले आहे. कृतिकासोबत दोघांची बाचाबाची झाली. दोघांपैकी एकाने फायटरने कृतिकाची निर्घृण हत्या केली. कृतिका ड्रग्जच्या आहारी गेल्याचे चौकशीत समोर आले आहे. ड्रग्ज माफियाच्या ती संपर्कात होती. ती त्यांच्यासाठी काम करत होती. त्यातून तिने मोठा पैसाही कमावला होता. त्यावरून तिचे साथीदारांसोबत वाद झाला होता. कृतिकाची हत्या करण्यापूर्वी मारेकºयांनी तिच्या घरी जेवणही केले होते. कृतिकाची हत्या केल्यानंतर मारेकºयांनी तिच्या रुममधील एसी सुरु केला होता. नंतर घराची साफसफाई केली होती. कृतिका आरोपींच्या संपर्कात होती, हे तिच्या कॉल रेकॉर्डवरून समोर आले आहे. दोन्ही आरोपी ड्रग्ज सप्लायर आहेत. ते अनेकदा कृतिकाच्या घरीही आले होते.

दरम्यान, कृतिका राहात असलेल्या सोसायटीच्या वॉचमनने पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती दिली होती. कृतिकाची हत्या झाली त्या रात्री दोन जणा एक पॅकेट देण्यासाठी तिच्या घरी आले होते. पॅकेटमध्ये कृतिकाच्या औषधी असल्याचे त्यांनी सांगितले होते. वॉचमनने सांगितले की, कृतिकाला भेटण्यासाठी नव-नवीन लोक येत होते. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा छडा लावला होता.

कृतिकावर अत्याचार झाल्याचा संशय, अर्धनग्नावस्थेत आढळला होता मृतदेह

कृतिका चौधरी हत्या प्रकरणाचे गूढ वाढत असून तिचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडल्याने हत्येपूर्वी तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय आधी पोलिसांनी व्यक्त केला होता. दरम्यान, कृतिकाचे ज्या तरुणाशी तिचे शेवटचे बोलणे झाले होते त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस भरतीसाठी उमेदवाराची ‘डोकॅलिटी

News Desk

खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ- ईडीकडून पुढची कारवाई

News Desk

अमृता फडणवीस फसवणूक प्रकरण; मुंबई पोलिसांनी डिझायनरला उल्हासनगरमधून घेतले ताब्यात

News Desk