HW News Marathi
मुंबई

घराचे छत कोसळून मुलीचा मृत्यू

भिवंडी-शहरातील पद्मानगर परिसरात असलेल्या एका जुन्या घराचा सिमेंटचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका आठ वर्षीय मुलीचा उपचारा पूर्वीच जागीच मृत्यू झाला आहे . या दुर्घटनेमुळे धोकादायक घर व इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी भिवंडीत धोकादायक ३ इमारती व ६ घरे झोपड्या कोसळल्या होत्या या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले होते . पद्मनगर येते मध्यरात्री झालेल्या या दुर्घटने बाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद घेत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे .

भिवंडी महानगर पालिकेच्या प्रभाग समिती ३ च्या अखत्यारीत येणाºया पद्मनगर येथे नागेश कोका हे आपल्या कुटूंबा सह घरामध्ये रात्री जेवण करून झोपले असता रात्री २ च्या सुमारास ते झोपेत असताना त्यांच्या जुन्या घराचे सिमेंटचे छत झोपलेल्या मुलीच्या अंगावर पडल्यानी मोनाक्षी नागेश कोका (८ वय ) हि गांभीय जखमी झाली असता तिला त्वरित उपचारा करीत उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे . या दुर्घटने बाबत पालिकेच्या प्रभाग अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन विभागाला कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले महानगर पालिका आयुक्तांनी पावसाळ्यामध्ये होणा?्या दुर्घटना लक्षत घेता प्रभाग १ते ५ प्रभागांमध्ये विशेष आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केले आहेत पालिका कार्यक्षेत्रात दुर्घटना झाल्यास कर्मचारी अधिका?्यांनी घटना स्थळी धाव घेऊन लोकांना सहकार्य करावे असे आदेश दिले आहे मात्र प्रभाग अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी हे निर्धास्थ राहून भोगलं काम करत असल्याचे उघड झाले आहे या बाबत आयुक्तांनी दाखल घेऊन संबंधितांवर करावी करावी अशी मागणी नागरिकांना कडून होत आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाईंदरमध्ये तृतीयपंथीयांना मारहाण

swarit

मुंबईमध्ये उभी राहिली ‘माणुसकीची भिंत’

News Desk

मनसेकडून नाणार प्रकरणी खळ्ळ खट्याक

News Desk