HW News Marathi
महाराष्ट्र

ठाणे स्थानकात फुकट्याकडून तब्बल 57 लाखांची दंडवसुली

15 महिन्यात 23 हजाराहून अधिक विनातिकीट प्रवाशी टीसीच्या जाळ्यात

ठाणे रेल्वे स्थानकातून लाखो प्रवाशी ये-जा करीत असतात याच प्रवाशांच्या आडोशाला फुकट प्रवाशांचाही मोठा लवाजमा राष्ट्रीय संपत्तीचा उपभोग घेऊन रेल्वे प्रशासनाला चुना लावण्याचा प्रयत्न करतात . दरम्यान मध्य रेल्वेने या फुकट्या प्रवाशांना दणका देण्यासाठी तैनात केलेल्या तिकीट तपासनीस यांच्याद्वारे धडा शिकविण्यात यशस्वी झाली आहे . 15 महिन्याच्या कालावधीत ठाणे स्थानकात कार्यरत 18 तिकीट तापसणीसानी 23 हजार 583 फुकट्या प्रवाशांची धरपकड करीत त्यांच्याकडून दंडापोटी तब्बल 57 लाखाची विक्रमी वसुली केली असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी यांनी दिली .

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सुमारे 7 लाख प्रवासी ये-जा करतात.त्यामुळे ठाणे स्थानक नेहमीच गजबलेले असते. ठाणे स्थानकात एकूण 11 फलाट असून येथून मध्य रेल्वे मार्गावर आणि वाशी-पनवेलसाठी ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल धावत असतात.सतत प्रवाश्यांचा राबता असलेल्या या स्थानकातून प्रवाश्यांना ये-जा करण्यासाठी दोन जुने आणि दोन नवीन असे चार पादचारी रेल्वे पूल आहेत.किंबहुना तुलनेने मुबलक तिकीट खिडक्या तसेच,तिकीट व्हेडिंग मशीन्सदेखील स्थानकात बसवण्यात आलेल्या आहेत.तरीही,अनेक फुकटे प्रवाशी स्थानकातून बाहेर पडण्यासाठी अधिकृत आणि खुश्कीच्या मार्गांचा वापर करतात.हीच बाब हेरुन मध्यरेल्वे प्रशासनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाणिज्य विभागाच्या मदतीने तीन शिफ्टमध्ये 7 महिला टीसीसह 18 जणांच्या चमूने अशा फुकट्या प्रवाश्यांची पुरती कोंडी करीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात अली होती . त्यानुसार,मागील 15 महिन्यात रेल्वेतील फुकट्या प्रवाशांना चांगलीच अद्दल घडली आहे. एप्रिल 2016 ते मार्च 2017 या वर्षभराच्या कालावधीत 18 हजार 258 विनातिकीट प्रवाश्याकडून सुमारे 43 लाख 63 हजार 382 रुपये दंड वसूल करण्यात आला . तर, 2017 या वर्षात एप्रिल महिन्यापर्यंत तब्बल 1,987 प्रवाश्याकडून 5 लाख 6 हजार 430, मे महिन्यात 1,685 जणांकडून 4 लाख 34 हजार 880 आणि जून अखेरपर्यंत 1,653 जणाकडून 3 लाख 95 हजार 855 रुपये दंड वसूल केला.अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी यांनी दिली.

कुठल्याही सार्वजनिक वाहतूक उपक्रमातून विनातिकीट प्रवास करणे सामाजिक गुन्हा आहे.यासाठी दंडात्मक कारवाईसह कोठडीत रवानगी केली जाते.तेव्हा रेल्वेच्या विकासासाठी पर्यायाने देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी तिकीट काढून प्रवास करणे उचित.असे मत मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोपीकिशन बाजोरियांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे ! – नाना पटोले

News Desk

पालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्यच 

News Desk

‘त्यात चुकीचं काय केलं’, अदानी एअरपोर्ट नामफलक हटवल्याच संजय राऊतांकडून समर्थन…!

News Desk