नाशिक- नाशिकच्या छापखान्यात २०० च्या नव्या नोटांची छपाई करण्यात आली असून लवकरच या नोटा चलनात येणार आहे. पाचशे, हजाराच्या नोटा बंद केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने नव्याने पाचशे व दोन हजारांची नोट चलनात आणली होती, त्यानंतर आता दोनशेची नोटा चलनात आणण्याचा आरबीआयचा विचार आहे. त्यासाठी नाशिक येथील प्रिंटमध्ये नोटांची छपाई करण्यात आली असून या नोटा लवकरच चलनात येणार आहे. आरबीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दोन हजाराची नोट चलनात आल्यानंतर त्याचे सुटे पैसे देण्यासाठी समस्या निर्माण होत असल्याने लहान पाचशेपेक्षा लहान मूल्याची नोट नोटेची मागणी सर्वच स्तरांतून केली जात होती. त्यावर सकारात्मक विचार करून, दोनशे रुपयांची नोट चलनात आणली जात असल्याचे बोलले जात आहे.
अशी असेल दोनशेची नोट
इंटरनेटवर सध्या ही नोट व्हायरल झाली आहे. ही नोट हिरव्या आणि जांभळ्या रंगात दाखवण्यात आली आहे. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. परंतु नव्या पाचशेच्या नोटाप्रमाणे या नोटांचा आकारदेखील छोटा असेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.