HW News Marathi
मुंबई

शुक्रवार ठरला वाहतूक जाम दिवस

मुंबई: मध्य रेल्वे मार्गावर कल्याण स्थानकाजवळ मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बदलापूरकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. तर दुसरीकडे हार्बर मार्गावर कुर्ला- टिळकनगरदरम्यान मालगाडी बंद झाल्याने मुंबईहून पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे शुक्रवारी दिवसभर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

मुंबईत पावसाचे आगमन झाल्यापासून मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर तांत्रिक बिघाडांचे सत्रच सुरू आहे. शुक्रवारी दुपारी कल्याण स्थानकाजवळ मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. इंजिन रुळावरून घसरले असून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरूच होते. यामुळे कल्याणहून बदलापूर- कर्जतच्या दिशेने जाणाºया गाड्या खोळंबल्या. तसेच कसाराकडे जाणाºया लोकलचाही खोळंबा झाला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी नाशिक- मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ओढा- नाशिकदरम्यान वाराणसी- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडले. यामुळे नाशिककडून मुंबईकडे येणाºया लांबपल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या होत्या.

दुसरीकडे मुंबई- नाशिक महामार्गावरही वाहतूक कोंडी झाली आहे. जुना मुंबई-आग्रा हायवे, जुना मुंबई-पुणे हायवे, ठाण्यातील मुंब्रा-शीळफाटा, काल्हेर-कशेळी-कल्याण, माजीवडा नाका, माणकोली नाका या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ठाण्यातून नाशिक आणि नवी मुंबईकडे बाहेर पडणारे सर्व रस्ते जाम झाले आहेत. मुंबई-नाशिक हायवेवर तीन अवजड वाहने काही अंतरावर भर रस्त्यात बंद पडल्याने रांजणोली नाक्याकडून खारेगाव टोलनाक्याकडे येणारी वाहतूक मंदावली. परिणामी काल्हेर, कल्याण-भिवंडी, मुंब्रा, शिळफाट्यापर्यंत वाहतूक संथगतीने सुरू होती. मुंब्रा बायपास-शीळफाटा परिसरात पावसानं मोठे खड्डे पडले आणि रेतीबंदर रस्त्यावर पाणी साचलं त्यामुळे जुना मुंबई-पुणे हायवे सात ते आठ किलोमीटर्सचा जाम झाला आहे. तर ठाण्यात येणाºया अवजड वाहनांच्या रांगा पनवेलपर्यंत लागल्याच चित्र होत. तसेच रॅन्सम वायरस अटॅकमुळे जेएनपीटी बंदरात कंटेनर्सची वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अनेक कंटेनर्स बाहेर अडकले असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोस्टल क्लीनअप डे’चा उत्साह, श्रमदानाने युवकांनी केली दादर चौपाटीची स्वच्छता

News Desk

“युवाशक्तीने पूर्ण ताकदीने काम करुन काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यात योगदान दिले पाहिजे “- नाना पटोले

News Desk

धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग

News Desk