HW News Marathi
शिक्षण

म.रा.पत्रकार संघ तालुका कार्यकारणी घोषीत

विनोद तायडे

वाशिम-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मालेगाव तालुका कार्यकारणी जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांच्या अध्यक्षतेखाली घोषित करण्यात आली.

स्थानिक विश्राम गुहामध्ये 29 जूनला दुपारी 2 वाजता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मालेगाव तालुका कार्यकारणी निवड प्रक्रिया जिल्हा अध्यक्ष विनोद तायडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान,जिल्हा संघटक महादेव हरणे,जिल्हा सदस्य नामदेव पतंगे आदींच्या उपस्थितीत पार पडली .मालेगाव तालुका अध्यक्ष पदी तुषार मांडे, कार्याध्यक्ष पंजाबराव घुगे,उपाध्यक्ष नंदकिशोर वनस्कर,सचिव प्रशांत लोखंडे, सहसचिक प्रकाश भुरे, कोषाध्यक्ष विशाल लांडकर,सहकोषाध्यक्ष रजनीकांत वानखडे आदींची अविरोध निवड करण्यात आली यावेळी केशव गीद,गणेश इंगोले,धनंजय बकाल,अमोल नवघरे, विनोद अदमने,राजू चक्रणारान, प्रवीण घुगे,नितीन गायकवाड,अनिकेत घुगे दिलीप शिंदे,विजय शेंडगे,पांडुरंग जटाळे आदी असंख्य पत्रकार बांधवाची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार मांडे तर आभार महादेव हरणे यांनी मानले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

छात्र भारती आक्रमक, एल्फिन्स्टन कॉलेजवर अॅट्रॉसिटी दाखल करणार  

News Desk

सर्जनशील मोफत कार्यशाळा

News Desk

बी.फार्म करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका तत्वावर मेडिकल दुकानात काम करता येणार

News Desk
क्राइम

मंजुळावर तुरूंगात पाशवी लैंगिक अत्याचार – इंद्राणीची माहिती

News Desk

मुंबई – हत्येची शिक्षा भोगत असलेली कैदी मंजूळा शेट्ये हत्येप्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आलीय. या घटनेची साक्षीदार इंद्राणी मुखर्जीनं न्यायालयात ही धक्कादायक माहिती दिली. सत्र न्यायालयात इंद्राणी मुखर्जीनं सांगितलं की, कैदी मंजुळा शेट्येवर तुरूंगात पाशवी लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. मंजुळाच्या गळ्याला ओढणी आवळून तिला बेदम मारहाण कऱण्यात आली. हा क्रुरपणा एवढ्यावरच थांबला नाही. मंजुळाच्या गुप्तांगामध्ये काठीनं हल्ला करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक माहिती यावेळी इंद्राणीनं न्यायालयाला सांगितली.

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवर मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी भायखळा कारागृहात दंगल केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर इंद्राणीनं कारागृह प्रशासनानं मारहाण केल्याचा दावा करत विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली आहे. सीबीआयच्या न्यायालयानं इंद्राणी मुखर्जीला वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्याचा, सोबतच तक्रार दाखल करण्यासाठी नागपाडा पोलीस ठाण्यात नेण्याचा आदेश दिला आहे. मंजुळाच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्युनंतर राज्यातील एकूणच तुरूंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे.

https://www.facebook.com/mahabatmi365/

Related posts

संजय राऊतांची आज न्यायालयीन कोठडी संपणार; काय निर्णय येणार, याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

कल्याणमध्य़े राडा,तलवारीने वार, 25 जणांविरोधात गुन्हा दाखल

News Desk

मांजरा नदीपात्रात रेती ठेकेदारांची दबंगगीरी

News Desk