HW News Marathi
मुंबई

डोंबिवलीतलं अतिक्रमण पाडायला प्रशासनाला वेळ नाही

  • आत्मदहन केल्यावर न्याय मिळेल का, जागा मालकाचा संतप्त सवाल

धीरज घोलप

डोंबिवली – एका ज्येष्ठ नागरिकाच्या मालकीच्या जागेवर दुसऱ्यानं केलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडे वेळ नाहीये. शासन दरबारी खेटा मारून थकलेल्या या ज्येष्ठ नागरिकांनं आता आत्मदहनाचा निश्चय केलाय.

जगन पांडुरंग म्हात्रे (वय ६२ वर्षे) यांचं डोंबिवली पश्चिम इथल्या महाराष्ट्र नगरमधील गरीबांचा वाडा इथं जगन म्हात्रे यांचं स्वतःच्या मालकीचं घर आहे. त्यांच्या एकूण जागेपैकी अडीच हजार स्क्वेअर फुट जागेवर हरिश्चंद्र सत्यवान पाटील आणि शंकर म्हात्रे या दोघांनी अतिक्रमण करून स्वतःच बांधकाम सुरू केलंय. याला जगन म्हात्रे यांनी विरोध केला. मात्र, तरीही बांधकाम सुरूच आहे. त्यामुळं जगन यांनी पोलिस आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या. परंतु, जगन म्हात्रे यांना फक्त कारवाईची आश्वासनं मिळाली, पण कारवाई काही झालीच नाही.

जगन म्हात्रे यांच्या जागेवर २०१४ मध्ये हरिश्चंद्र पाटील आणि शंकर म्हात्रे या दोघांनी अतिक्रमण केलंय. तेव्हापासून न्याय मिळावा म्हणून जगन म्हात्रे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, याच कालावधीत जगन म्हात्रे यांना रक्ताचा कॅन्सरही जडलाय. एकीकडं या महाभंयकर आजाराशी झुंज देत दुसरीकडं स्वतःच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठीची दुहेरी लढाई जगन म्हात्रे सध्या लढत आहेत. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी न्याय मिळत नसल्यानं आता आत्मदहनाचा विचार केल्याचं सांगितलं.

हरिश्चंद्र पाटील आणि शंकर म्हात्रे या दोघांनाही जगन म्हात्रे यांच्या जागेतील अनधिकृतरित्या केलेलं बांधकाम स्वखर्चानं तीस दिवसांत पाडून टाकण्याचे आदेश २३ ऑक्टोबर २०१५ रोजी दिले होते. मात्र, अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधी होऊनही ते अतिक्रमण पाडण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आलंय.

यासंदर्भात जगन म्हात्रे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेला अतिक्रमण काढण्याबाबत लेखी तक्रारी दिल्या आहेत. त्यानंतर ११ एप्रिल २०१७ रोजी महापालिकेनं कल्याणच्या परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्तांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी जगन म्हात्रे यांच्या जागेवरील अतिक्रमण पाडण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त मागितला होता. मात्र, या पत्रालाही दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेलाय, पण अजून अतिक्रमण काही काढण्यात आलेलं नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरी पूल दुर्घटनेसाठी पालिका जबाबदार | मुंबई हायकोर्ट

News Desk

अंगणवाडी सेविकांचा मेस्मा काढण्यास सरकारचा पुन्हा नकार ; काय म्हणाले या चर्चेत धनंजय मुंडे

News Desk

खरेदीविक्रीचा बाजार कुणी मांडलाय

News Desk