HW News Marathi
क्राइम

बोगस कॉलसेंटवर छापा, 9 जण अटक

अंबरनाथ येथे बोगस कॉल सेंटरवर गुन्हे शाखेने छापा मारून नऊ जणांना अटक केली आहे. या 9 जणांची कसून तपास केली असता दोन वर्षापासून अमेरिकन नागरिकांना आर्थिक गंडा घालत असल्याचा समोर आला आहे. आतापर्यंत एक कोटी 16 लाखांची फसवणूक केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी 8 जुमन रोजी अंबरनाथ येथील रमेश

इंटरप्राइजेस इमारतीत माउंट लॉजिक सोल्युशन नावाने चालवणाऱ्या जाणाऱ्या कॉलसेंटरवर छापा मारला होता. यात मुख्य सुत्रधार देवेश येरलेकर याच्यासह 9 जणाला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार अमेरिकन नागरिकांना व्हीओआयपी कॉल करून कोलंबस बँकेतून बोलत आहे असे सांगून कर्ज मिळवून देण्याची बतावणी करत प्रोसेसिंग फीसच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांडून पैसे उकळले जात होते. २०१५ पासून हे कॉलसेंटर चालवले जात होते. कारवाईच्या वेळी पोलिसांनी हार्डडिस्क तसेच कागदपत्रे जप्त केली असून पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवरायां’नी शोधून दिले स्त्रीलंपट आरोपी

News Desk

दादरमधील हत्येचे रहस्य उघडकीस

swarit

‘सरल वास्तू’चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजींची 2 अज्ञातांकडून हत्या

Aprna