HW News Marathi
मुंबई

मुंबईतल्या ५०० फुटांपर्यतच्या घरांना करमाफी

मुंबई महापालिकेचा निर्णय

महापालिकेच्या निवडणूकीत मुंबईकरांना घरांवरील कर माफ करण्याचा आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन पुर्ण होण्याची शक्यता आहे. 500 चौरस फुटावरी घरांना कर माफ तर 700 चौरस फुटावरील घरांच्या मालमतेवर करात सवलत मिळणार आहे. सभागृहाचे नेते य़श्वत जाधव यांनी कर माफ करण्याबाबत ठरावाची सुचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्राद्वारे दिली आहे. यावर पुढील महिण्यात महासभेत निर्णय घेण्याची शक्याता आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसल्यानंतर शिवसेनेवर कडाडून टीका झाली होती. शिवाय भाजपासह विरोधकांकडूनही या मुद्द्यावरून शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. जकात कर बंद होण्याच्या मार्गावर असताना उत्पन्नाचा मोठा मार्ग असलेल्या मालमत्ता कर माफीने पालिका प्रशासन आर्थिक कोंडीत सापडण्याची शक्यता आहे. मात्र आश्वासनपूर्तीसाठी सेनेला ही जोखीम उचलण्याची गरज आहे की नाही, यावर ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात या आश्वासनाला गती मिळाल्याचे कळते.

तरी जीएसटी लागू होण्यापूर्वी या आश्वासनाची अंमलबजावणी करण्याच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत. म्हणूनच मंगळवारी ५०० चौरस फुटांना मालमत्ता कर माफ आणि ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना ६० टक्के सवलत देण्याची ठरावाची सूचना सभागृहात आणावी, अशी मागणी जाधव यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे. या महिन्यात पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडून त्यास तत्काळ मंजुरी मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, निसर्ग चित्रांचे प्रदर्शन

News Desk

मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करा | शरद पवार

News Desk

22 वर्षीय मुलीला आईनेच ढकलेल वेश्याव्यवसायात

News Desk