HW News Marathi
महाराष्ट्र

दारू पिणाऱ्यांना महिलांनी दिला चोप, व्हिडिओ व्हायरल

चाकूर – लातूर जिल्ह्यातील चाकूर शहरातल्या महिलांनी अवैध दारूच्या विक्रीविरोधात रणशिंग फुंकलय. या अवैध दारू विक्रीबाबत पोलिसांना वारंवार निवेदन देऊनही कुठलीच कारवाई होत नव्हती. म्हणून संतप्त महिलांनीच दारू पिणाऱ्यांना पकडून चांगलाच चोप दिलाय. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

चाकूर शहरात एक महिला अवैधरित्या दारूची विक्री करते. तिच्या विरोधात स्थानिक महिलांनी पोलिसांना निवेदनंही दिलं. मात्र, तरीही अवैधरित्या दारूची विक्री सुरूच होती. त्यामुळं महिलांचा संयम अखेर गुरूवारी सुटला. अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या महिलेच्या घरातील दारूच्या बाटल्या या महिलांनी फोडल्या. त्यानंतर त्या ठिकाणी दारू पिण्यासाठी आलेल्या चार ग्राहकांनाही या महिलांनी जोरदार चोपलं. या चौघांपैकी एक जिल्हा परिषदेचा शिक्षक असल्याची माहिती पुढं येतेय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री निधी देताना कोणतीच काटकसर करत नाहीत, अब्दुल सत्तारांचा चव्हाणांना पलटवार

News Desk

अजित पवारांनी घेतली रस्ते कंत्राटदारांची शाळा, सहनशीलतेचा अंत पाहू नका…

News Desk

तुमचा राग तुमची मने जिवंत ठेवा !

News Desk