HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबै बँकेप्रकरणी आरोप केल्यामुळे दरेकरांनी ‘या’ काँग्रेसच्या नेत्यांना पाठवली नोटीस

मुंबई | मुंबै बँकेप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नोटीस पाठवली आहे. या दोघांनी दरेकरांवर बँक घोटाळ्याचा आरोप केल्याप्रकरणी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मुंबै बँकेत दरेकरांनी २ हजार कोटींचा घोटाळा दरेकरांनी केल्याचा आरोप या दोघांनी केला होता. या प्रकरणी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांना १०० कोटी अब्रूनुकसानी नोटीस दरेकरांच्या वकिला मार्फत पाठवण्यात आली आहे. या नोटीसीनुसार दोन्ही नेत्यांनी सात दिवसाच्याआत माफी मागावी. अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यात येईल, अशी नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीससंदर्भात काँग्रेसकडून काय उत्तर देण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. 

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अोबीसी महामंडळाने व्याजमुक्त कर्ज योजनेचा प्रस्ताव सादर करा-राम शिंदे

News Desk

आमदारांची साद अन् अजित पवारांचा प्रतिसाद, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यासाठी मोठी घोषणा

News Desk

पर्यावरण दिनानिमित्त उद्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा सन्मान

Aprna