HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबई तांत्रीक बिघाडीमुळे सेंट्रल रेल्वे विस्कळीत झाली आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील बंद असून येथील वाहतूक प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वर वळण्यात आली आहे.

विद्युत पुरवठ्यामध्ये समस्या निर्माण झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेत मध्य रेल्वेवर खोळंबा झाल्यानं प्रवासी प्रचंड संतापले आहेत.

ऐन गर्दीच्यावेळी सकाळी किंवा संध्याकाळी उपनगरीय लोकल सेवा कोलमडत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. अशा घटना कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच चालल्या आहेत. शुक्रवारी (12 मे) संध्याकाळीदेखील हार्बर पाठोपाठ मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली होती. कधी रेल्वे रुळाला तडा, कधी ओव्हहेड वायर तुटणे तर, कधी सिंग्नल यंत्रणेतील बिघाड यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बहुतांशवेळा हा बिघाड सकाळच्यावेळी होतो. त्यामुळे घरातून वेळेत बाहेर पडूनही प्रवाशांना वेळेत कार्यालय गाठता येत नाही

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dahi Handi | ठाण्यात पहायला मिळणार प्रो-गोविंदा स्पर्धेचा थरार, 10 थरांसाठी 21 लाखांच बक्षीस

News Desk

रेल्वे कर्मचाऱ्यांना खूशखबर ,केंद्र सरकारकडून दिवाळीचा बोनस जाहीर

Gauri Tilekar

बदलापूरमधील केमिकल कंपनीला भीषण आग

News Desk