HW News Marathi
महाराष्ट्र

6 मे ला नांदेडमध्ये पाळीव कुत्र्यांसाठी मोफत रेबीज लसीकरण

उत्तम बाबळे

नांदेड – मोकाट असो का पाळीव कुत्री, त्यांच्या चाव्याने माणसांना रोग होण्याची शक्यता असते. नव्हे तर उपचारा अभावी काहींना प्रसंगी जीव गमवावा लागतो. अनावधानाने मानवी सहवासातल्या पाळीव श्वानांच्या चावा ही घातक ठरतो. यावर उपाय योजना म्हणून सामाजिक स्वास्थ संवर्धनाच्या हेतूने जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त नांदेड शहरातील सर्व पाळीव कुत्र्यांना 6 मे रोजी नांदेड एस.पी.सी.ए.या संस्थेमार्फत पोटातील कृमीनाशक ओषध व रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन पशुचिकित्सालय ,स्टेडियम नांदेड येथे करण्यात आले आहे.

श्वानांच्या चावण्यामुळे रेबीज हा जीवघेणा आजार मनुष्य व प्राण्यांमध्ये होतो. अशा दुर्धर आजाराचा प्रसार टाळण्यासाठी व सामाजिक स्वास्थ्य संवर्धनासाठी नांदेड एस.पी.सी.ए. संस्थेमार्फत वर्षातून दोन वेळा रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात येते.

शनिवार ,६ मे रोजी सकाळी १०:०० ते सायं. ५:०० वा. पर्यंत हे शिबीर चालणार आहे. नांदेड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.स्मीता उके यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन होणार असून या शिबिराचा जास्तीत जास्त श्वान पालकांनी लाभ घ्यावा व सामाजिक स्वास्थ्य जपावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ उंबरकर यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुळजापूरमधील मराठा क्रांती मोर्चा आयोजित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

News Desk

मी गद्दार नाही, शिवसेनेचा खरा गद्दार अनिल परब आहे!; रामदास कदमांचा सवाल

Aprna

भिवंडी इमारत दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांना दु:ख

News Desk