HW News Marathi
महाराष्ट्र

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत मिळणार नुकसान भरपाई

तत्कालिन जिल्हाधिकारी काकाणी यांच्या प्रयत्नांचे यश

उत्तम बाबळे

नांदेड :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत २०१६ – १७ च्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी नांदेड जिल्ह्यास तब्बल पाचशे दोन कोटी रुपयांची विमा रक्कम म्हणून जाहीर झाले आहेत. राज्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असा उच्चांकी पीक विमा मिळाला आहे. खरीप हंगाम 2016 मध्ये सात लाख ६७ हजार ९७३ शेतकऱ्यांनी ३० कोटी ४० लाखांचा हप्ता भरला. त्यामुळे नुकसान भरपाईपोटी ४ लाख ४४ हजार ७४ शेतकऱ्यांना पाचशे दोन कोटी तीन हजार रुपयांची विमा रक्कम मिळणार आहे. यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे यांनी केलेल्या सातत्यपुर्ण प्रयत्नांना यश मिळाले आहे. नुकसान भरपाई मिळालेल्या पिकांत प्रामुख्याने मुग, उडीद, ज्वारी, सोयाबीन यांचा समावेश आहे.

पीक विम्याबाबत जिल्हा महसूल प्रशासन, कृषी, सहकार आणि बँकांनी समन्वयाने राबविलेल्या प्रयत्नामुळे आणि शेतकऱ्यांमध्ये पीक विमा संरक्षणाबाबत निर्माण झालेल्या जाणीव-जागृतीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात विमा रक्कम मिळाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सन २०१४ – १५ च्या खरीप हंगामापासूनच पीक विमा भरण्याबाबत सकारात्मक जाणीव-जागृती झाल्याचे आकडेवारीवरूनही स्पष्ट झाले आहे. सन २०१५ च्या खरीप हंगामासाठीही २४५ कोटी ५२ लाख रुपये विमा संरक्षणापोटी मिळाले होते. त्यानुसार सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात विमा संरक्षणाचा दिलासा देण्यात यश आले आहे. यामुळे खरीप हंगाम २०१६ मध्ये शेतकऱ्यांनी विमा योजनेत मोठा सहभाग नोंदविला. जिल्हयामध्ये २०१६ च्या खरीप हंगामात ७ लाख ६९ हजार २५० हेक्टरवर पेरणी झाली होती. यात जिल्ह्यातील ७ लाख ६७ हजार ९७३ शेतकऱ्यांनी ३०.४८ कोटी विमा हप्ता बँकांद्वारे भारतीय कृषि पिक विमा कंपनी, मुंबई यांच्याकडे कंपनीकडे भरला होता. ज्यामुळे ३ लाख ८३ हजार ६९.३८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विमा संरक्षण मिळाले. या कंपनीकडून खरीप हंगाम २०१६ साठी नुकताच नुकसान भरपाई म्हणून नांदेड जिल्ह्यास पाचशे दोन कोटी तीन हजार रुपयांची विमा रक्कम पिक संरक्षणापोटी जाहीर करण्यात आली. ही नुकसान भरपाई प्रामुख्याने कापूस व तूर वगळता मुग, उडीद, ज्वारी, सोयाबीन या पिकांना मिळाली. या पिकांसाठी जिल्ह्यातील ५ लाख ५५ हजार ८७२ शेतकऱ्यांनी १७ कोटी ९६ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. त्याद्वारे २ लाख ९२ हजार ८ हेक्टरवरील पीकसंरक्षित झाले होते. त्यातील ४ लाख ४४ हजार ७४ शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाई पोटी कंपनीने पाचशे दोन कोटी तीन हजार रुपयांचे विमा लाभ देण्याचे जाहीर केले आहे.

गत खरीप हंगाम २०१५ – १६ मध्येही ४ लाख ७२ हजार ६१७ शेतकऱ्यांनी पीक विमा हप्त्यापोटी १७ कोटी २४ लाख रुपये भरले होते. त्यातून त्यांना नुकसान भरपाई पोटी २४५ कोटी ५२ लाख रुपये मिळाले होते. यामुळे पीक विमा भरलेल्या ७ लाख ७ हजार ५६५ हेक्टर पैकी २ लाख ८० हजार ५०१.५४ हेक्टरवरील पिकांना संरक्षणापोटी रक्कम मिळाली.

पिकांच्या विमा संरक्षणपोटी मिळणारी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची बँक खातीही काढण्याची मोहिमही यशस्वी ठरली आहे.महसूल, कृषी, सहकार विभाग आणि बँकांमध्ये समन्वय सलग टंचाई सदृश्य परिस्थिती तसेच अतिवृष्टीचा फटका यामुळे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्याचा चंगच बांधला. सन २०१५ मधील शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद पाहून, सन २०१६ – १७ च्या खरीपासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वयासाठी बैठका घेण्यात आल्या. त्यामध्ये महसूल, कृषी आणि सहकार विभाग तसेच बँक यंत्रणांना प्रेरीत करण्यात आले. शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी कृषी सहायकापासून, कृषी पर्यवेक्षक,तलाठी यांचा सक्रीय सहभाग घेण्यात आला. व्हॅाटसॲपस ग्रुपचाही प्रभावी वापर करण्यात आला. शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी शेतकरी गट, शेतकरी मित्र, वृत्तपत्रे, आकाशवाणी, मोबाईल एसएमएस, ईलेक्ट्रॅानीक माध्यमे यांचा पुरेपूर वापर करण्यात आला.

तत्कालिन जिल्हाधिकारी काकाणी, डॉ. मोटे यांचे सातत्यपुर्ण प्रयत्न पीक विमा भरण्यात शेतकऱ्यांना कोणत्याही टप्प्यांवर अडचण येऊ नये यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करण्यात केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus :  बारामतीत सातवा कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

“गृहमंत्र्यांच्या या कारनाम्याबाबत शरद पवारांनाही माहिती होती”, परमबीर सिंग यांचे गंभीर वक्तव्य

News Desk

राजभवन आता कॅनव्हासवर : राजभवन येथील कार्यशाळेला राज्यपालांची भेट

Aprna