HW News Marathi
महाराष्ट्र

बीडीडी पूनर्विकासाला स्थानिकांचा विरोध

मुंबई- मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करतांना विश्वासात न घेतल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी विरोध करायला सुरुवात केली आहे.

बीडीडी चाळीतील रहिवाशांना विश्वासात न घेता पुनर्विकासासाठी DCR कायदा बदलला आणि या हुकुमशाही विरुद्ध कायदेशीर मार्गाने आवाज उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक केली जात असल्य़ाचा आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे.

मुंबईतील बीडीडी चाळीचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार सर्व बीडीडी चाळींच्या एकत्रित संघटनेने घेतला आहे, अशी माहिती अखिल बीडीडी चाळ रहिवासी महासंघाचे सेक्रेटरी डॉ. राजू वाघमारे यांनी दिली आहे.

“मला आणि माझे भाऊ असलेले स्वीकृत नगरसेवक सुनीत वाघमारे यांना भोईवाडा पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली. तसंच आमच्या जवळपास 10 पदाधिकाऱ्यांना वरळी पोलिसांनी अटक केली आहे. आम्हाला अटक करुन आमचा आवाज सरकार दाबू शकत नाही हे सरकारंनी लक्षात ठेवावे,” असं डॉ. राजू वाघमारेंनी स्पष्ट केलं आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यात ‘नारळफोड्या गॅंग’; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर टीका

News Desk

समुद्राचं पाणी गोड करायचं आहे की स्वतःचं उखळ पांढर करायचं आहे? विरोधकांचा ठाकरे सरकारला सवाल

News Desk

ऑनलाईन शाळा सुरु असल्या तरीही विद्यार्थ्यांना दिवाळीची सु्ट्टी मिळणार – वर्षा गायकवाड

News Desk