HW News Marathi
राजकारण

औसामध्ये युतीच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान मोदी-उद्धव ठाकरे प्रथमच एका मंचावर

मुंबई | लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापत दिसत आहे. सर्व राजकीय पक्ष त्यांच्या उमेदवारांच्या शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचार आज (९ एप्रिल) लातूर जिल्ह्यातील औसा येथे होणार आहे. युती झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र येत असून त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

औसा येथे धाराशीव मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व लातूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ युतीची जाहीर सभा होणार आहे. युतीच्या सभेतसाठी मोदी कर्नाटकातील बिदर येथून सकाळी ९.५० वाजता सभेच्या ठिकाणी दाखल होणार आहे. ठाकरे हे मुंबई हून विशेष विमानाने अहमदनगर येथे येणार असून यानंतर हेलिकॉप्टरने औसा येथे पोहचणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मुंबईहून विशेष हेलिकॉप्टरने सभेच्या ठिकाणी पोहचणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे, विश्वजीत कदम एकत्र

swarit

“चुना लगाव आयोग… “, उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

Aprna

शिंदे गटाने गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमधील मुक्काम हलविला; गोव्याच्या दिशेने रवाना

Aprna