HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यातील १६ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड १४ मार्चला           

१६ पैकी ८ पं.स.वर महिला राज येणार तर यात अनुसूचित जाती २,अनु.जमाती १,ना.मा.प्रवर्ग २ व सर्वसाधारन ३ सभापतींचा समावेष असून निवडणुक प्रक्रियेसाठी तालुकानिहाय पिठासीन अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उत्तम बाबळे नांदेड :- जिल्ह्यातील १६ पंचायत समिती च्या सभापती व उपसभापतींची निवड १४ मार्च रोजी होणार असून सदरील निवडणुक प्रक्रियेसाठी पिठासन अधिका-यांच्या नियुक्तीचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत.या निवडीत ८ पंचायत समितीवर महिला राज येणार असून यात अनु.जाती २,अनु.जमाती १,ना.मा.प्रवर्ग १ व सर्वसाधारन ३ सभापतींचा समावेश राहणार आहे. नांदेड जिल्ह्यातील पं.स.सभापती करीता निर्धारीत आरक्षण पुढील प्रमाणे आहे.अनुसूचित जाती ३,अनुसूचित जमाती २,नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ४,सर्वसाधारन ७ एकुण १६ सभापती.तर तालुका व आरक्षण निहाय सभापती पुढील प्रमाणे आहेत.कंधार-अनुसूचित जाती ,नायगाव खै.-अनुसूचित जाती महिला,हदगाव-अनुसूचित जाती महिला,माहूर-अनुसूचित जमाती,बिलोली-अनुसूचित जमाती महिला,किनवट-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,मुखेड-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,अर्धापुर-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला ,भोकर-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला,हिमायतनगर -सर्वसाधारन महिला,मुदखेड-सर्वसाधारन महिला,धर्माबाद-सर्वसाधारन महिला.तसेच उर्वरित नांदेड,उमरी,लोहा व देगलूर या पंचायत समितींचे सभापती पद अनारक्षीत राहतील. जिल्हा परिषद व पंचायत समिती अध्यक्ष,सभापती व उपसभापती निवडणुक प्रक्रिया संहिता अधिनियम १९६१ चे कलम ६५ व अधिनियम ६७,६८आणि आदी कलमांनुसार सदरील निवडणुक दि.१४मार्च २०१७ रोजी करण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीआदेश जारी केले असून सकाळी १० ते दुपारी २:००वाजताच्या दरम्यान ही निवडणुक प्रक्रिया त्या त्या पंचायत समितीच्या सभागृहात पार पडणार आहे.तसेच या निवड प्रक्रियेसाठी सर्व अधिनियम व अधिकार पिठासीन अधिका-यांना बहाल करण्यात आले असून ते पिठासीन अधिकारी तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहेत.माहूर-सिद्धेश्वर वरणगावकर,तहसिलदार माहूर.किनवट-राजेंद्र भारुड,सहा.जिल्हाधिकारी किनवट.हिमायतनगर-गजानन शिंदे,तहसिलदार हिमायतनगर.हदगाव -संदिप कुलकर्णी,तहसिलदार हदगाव.अर्धापुर – किरण अंबेकर,तहसिलदार अर्धापुर.नांदेड -प्रदिप कुलकर्णी,उपविभागीय अधिकारी नांदेड.मुदखेड – सुरेश घोळवे,तहसिलदार मुदखेड.भोकर – दीपाली मोतीयेळे,उपविभागीय अधिकारी भोकर.उमरी – ज्योती पवार,तहसिलदार उमरी.धर्माबाद – सचिन खल्लाळ,उपविभागीय अधिकारी धर्माबाद.बिलोली – डी.एल.गाढे,तहसिलदार बिलोली.नायगाव खै. – के.एच.पाटील,तहसिलदार नायगाव खै. लोहा – उषाकिरण श्रृंगारे,तहसिलदार लोहा.कंधार – अरुणा संगेवार,तहसिलदार कंधार.मुखेड – व्ही.एल.कोळी,उपविभागीय अधिकारी मुखेड.देगलुर – महादेव किरवले,तहसिलदार देगलुर.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री गुलाबराव पाटील थेट गिरीश महाजनांच्या घरी!

News Desk

मराठा समाजाला लॉटरी, १६ टक्के आरक्षणानुसार शिक्षक भरती

News Desk

“उद्धव ठाकरेंची महाविकासआघाडीत घुसमट होतेय, आज ना उद्या ते बाहेर पडतील”, संजय काकडेंचं मोठ विधान

News Desk