HW News Marathi
राजकारण

राहुल गांधींकडे १५ कोटींची संपत्ती, ७२ लाख रुपयांचे कर्ज, प्रतिज्ञापत्रातील माहिती

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल (४ एप्रिल) केरळच्या वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरतांना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये राहुल गांधी यांच्या नावे एकूण १५.८८ कोटींची संपत्ती आहे. २०१४ मध्ये राहुल गांधी यांच्याकडे ९.४ कोटींची संपत्ती होती. गेल्या पाच वर्षात राहुल गांधी यांच्या संपत्तीत जवळपास ६.४८ कोटींची वाढ झालेली पाहायला मिळते. तसेच राहुल गांधी यांची आई सोनिया गांधी यांच्याकडे ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.

राहुल गांधी यांच्याकडे ५ कोटी ५० लाख ५८ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर स्थावर मालमत्तेची किंमत १० कोटी ८ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अशातरेने राहुल गांधी यांच्याकडे एकूण १५ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता आहे. राहुल गांधी यांच्याकडे फक्त ४० हजार रुपये रोख रक्कम आहे. १७ लाख ९३ हजार रुपयांची बँक डिपॉझिट आहे. यंग इंडियनचे एकूण १९०० शेअर्स त्यांच्याकडे आहेत, ज्याची किंमत १९ लाख रुपये आहे. पीपीएफमध्ये ३९ लाख ८९ हजार रुपये आहेत. याशिवाय ३३३.३० ग्रॅम सोने आहे. या सोन्यांची किंमत जवळपास २ लाख ९१ हजार रुपयेऐवढी आहे. तर म्युचुअल फंडमध्ये एकूण ५ कोटी १९ लाख रुपये आहेत. अशी एकूण ५ कोटी ८० लाखांची जंगम मालमत्ता राहुल गांधीकडे आहे.

महरोलीच्या सुल्तानपूरमध्ये प्रियांका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी यांच्या नावे संयुक्तरित्या १ कोटी ३२ लाखांची जमीन आहे. गुरुग्राममध्ये सिग्नेचर टॉवर बीमध्ये व्यावसायिक इमारत आहे, ज्याची किंमत जवळपास ८ कोटी ७५ लाख रुपये आहे. अशी एकूण १० कोटी ८ लाखांची स्थावर मालमत्ता राहुल गांधींकडे आहे. राहुल गाधींनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्या नावे एकही गाडी नाही. तसेच त्यांच्या नावे ७२ लाख रुपयांचे कर्ज आहे. lत्यातील ५ लाख रुपयांचे लोन त्यांनी आई सोनिया गांधी यांच्याकडूनही घेतले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारने घरोघरी ‘बार’ उघडण्याचा परवाना देऊन ‘क्रांतिकारक’ पाऊल टाकले !

News Desk

कोणताही पक्ष १०० टक्के सर्वोत्तम नाही | भागवत

News Desk

हज यात्रेकरूंच्या तिकिटांवर जीएसटी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार | आठवले

News Desk