HW News Marathi
देश / विदेश

शहीद भगतसिंगांचं ते पिस्तुल 90 वर्षांनंतर जगासमोर

इंदूर – ब्रिटिश अधिकारी जॉन सँडर्सवर ज्या पिस्तुलातून भगतसिंगांनी गोळ्या झाडल्या होत्या ते पिस्तुल तब्बल 90 वर्षांनंतर सर्व जगासमोर आणण्यात आले आहे.

बीएसएफच्या सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स एँड टॅक्टिक्स (सीएसडब्ल्यूडी) सग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1969 पर्यंत पंजाब पोलिस अकादमीमध्ये ऑक्टोबर हे पिस्तुल होते. तेथून ते इंदूरमध्ये आले.परंतु, हे पिस्तुल कुणाचे, इंदूर येथे ते कसे आले याची काणतीही नोंद नव्हती. सीएसडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी पिस्तुलचा अभ्यास केल्यावर ते पिस्तूल भगतसिंगांचे असल्याची माहिती समोर आली आहे.

पिस्तुलावरील रंग काढताना त्यावरिल सिरियल नंबर समोर आला. त्यावरून हे पिस्तुल कुणाचे असावे याचा शोध घेताना, साँडर्स खटल्यातील पिस्तुलशी हा नंबर जुळला. त्यावरून, हे पिस्तुल भगतसिंग यांचे असल्याची माहिती समोर आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. इंग्रजांच्या अमानुष मारहाणीत क्रांतिकारक लाला लजपतराय यांचा 1928मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरु व सुखदेव या तिघांनी ब्रिटिश पोलिस अधिकारी जे. पी. साँडर्स याची त्यांनी हत्या केली. याप्रकरणीच पुढे भगतसिंग- राजगुरू- सुखदेव यांना फाशीची शिक्षा ठोठावली गेली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींच्या हॅलिपॅडसाठी तब्बल १००० झाडांची कत्तल

News Desk

अखेर हुकूमशाहीचा विजय झालाच !

News Desk

सचिन पायलट यांच्या गटाला उच्च न्यायालयाने २४ जुलैपर्यंत दिला दिलासा

News Desk