HW News Marathi
महाराष्ट्र

सत्तेची मस्ती अधिक काळ टिकत नाही हे पंतप्रधान मोदींनी विसरु नये -सुशीलकुमार शिंदे

उत्तम बाबळे

भोकर:-स्व.इंदिरा गांधी यांच्या सारख्या एक स्वच्छ व कर्तुत्ववान नेत्या या देशाच्या पंतप्रधान असतांना आमच्या कांही कार्यकर्त्यांच्या चुकांमुळे या देशाने त्यांना पराभुत करुन सत्तेत येण्यापासून रोखले , असा या देशाचा इतिहास असतांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभागृहात नोटबंदी बाबत बोलतांना माजी पंतप्रधान डाॅ.मनमोहन सिंग यांच्या विषयी टिंगल टवाळीची भाषा वापरतात.यास सत्तेची मस्तीच म्हणावी लागेल.सत्तेची मस्ती अधिक काळ टिकत नाही हे भाजपा सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विसरु नये.असा घणाघाती प्रहार करुन जि.प. आणि पंचायत समितींची एक हाती सत्ता काँग्रेस पक्षाला द्यावी असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी माै.पोमनाळा ता.भोकर येथे संपन्न झालेल्या जि.प. व पं.स. निवडणुक प्रचार सभेत केले आहे.

भोकर तालुक्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या आयोजित जाहीर सभेसाठी मुख्य मार्गदर्शक म्हणुन माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी उपस्थिती लावली. मंचावर माजी राज्यमंत्री तथा आमदार.डी.पी.सावंत, काँग्रेस नांदेड जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर,तालुकाध्यक्ष सभापती जगदिश पाटील,नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड,उपनगराध्यक्ष गोविंद पाटील,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूर पालिकेतील १९ नगरसेवकांचे पदे रद्द

swarit

पुणे विमानतळाला वाढीव क्षमतेसह नवीन टर्मिनल इमारत मिळणार

News Desk

पुण्यातील व्यापाऱ्याला जीएसटी चुकविल्याप्रकरणी अटक

News Desk