HW News Marathi
क्राइम

दागिने चोरल्यानंतर महिलेचा खून

उमरी | एका पंचावन्न वर्षीय महिलेच्या अंगावरील दागिने चोरल्यानंतर तिचा खून केल्याची खळबळजनक घटना उमरी तालुक्यातील कारला इथे घडलीय.

शेषाबाई लक्ष्मण कुऱ्हाडे या 7 फेब्रुवारीला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शेताकडे जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या. मात्र, त्या वेळेत घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा रात्रभर शोध घेतला, त्यात त्यांना अपयश आले. दुसऱ्या दिवशी (8 फेब्रुवारी) गावकरी शेताकडे जातांना त्यांना गावाशेजारील नाल्यात महिलेचे प्रेत तरंगतांना आढळले. त्यानंतर ते प्रेत शेषाबाईंचं असल्याची खात्री गावकऱ्यांना झाली आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी शेषाबाईंचा तीक्ष्ण हत्यारांनी खून झाल्याचे स्पष्ट झाले. तिच्या अंगावरील दागिनेही जबरदस्तीने काढून घेतल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. दागिने चोरण्याच्या उद्देशाने तिचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यात टाकण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी शवविच्छेदनाचा संदर्भ देत वर्तवला आहे.

मृत शेषाबाईंचा मुलगा देवराव याच्या फिर्यादीनंतर उमरी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि.सी.जी.गुंडेवाड करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चोरी प्रकरणी आरोपीला फेसबूक प्रोफाईलवरून अटक

News Desk

सासरच्या जाचाला कंटाळून डॉक्टर तरुणीची आत्महत्या

News Desk

दरोडेखोरांकडून बँक अधिकाऱ्यासह पत्नीचा खून; दोन मुली जखमी

News Desk