HW News Marathi
महाराष्ट्र

शाळेत शिकणा-या मुलीकडे देशी कट्टा

हिंगोलीत तिसरीत शिकणाऱ्या मुलीकडे एक देशी कट्टा आणि ९ जिवंत काडतुसे आढळून आले आहेत. त्यामुळे हिंगोली शहर पोलिसांनी तात्काळ देशी कट्टा आणि काडतुसे जप्त केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तिसरीत शिकणाऱ्या मुलीकडे एक देशी कट्टा आणि ९ जिवंत काडतुसे असून शाळेत ती तिच्या मैत्रीणीला ती कट्टा दाखवत असताना शिक्षकांच्या नजरेस आले. त्यामुळे शिक्षकांनी याची चौकशी केली असता देशी कट्टा असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिक्षकांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. त्यामुळे कारवाई करत हिंगोली शहर पोलिसांनी तात्काळ देशी कट्टा आणि काडतुसे जप्त केली.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा कट्टा तिच्या वडिलांचा असल्याचे तिने सांगितले असून मुलीचे वडिल सय्यद मुश्ताक सय्यद आझम हे माजी सैनिक आहेत. परंतु त्यांनी बेकायदेशीररित्या कट्टा घरात ठेवलाच कसा असा प्रश्न विचारला जात आहे?

दरम्यान, याप्रकरणी सय्यद आझम याच्याविरुध्द हिंगोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु ८ वर्षाच्या मुलीकडे शाळेत देशी कट्टा सापडल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यपाल 12 आमदारांची नियुक्ती करतील’, नवाब मलिकांची टीका!

News Desk

आता मराठा समाजाच्या मुलांनी पुढे काय करायचं हे सरकारनं सांगावं? संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk

“शरद पवार म्हणतात तसं, निराशा आणि वैफल्यातून अशा चौकशांचा ससेमिरा लावला!” – संजय राऊत

News Desk