HW News Marathi
राजकारण

भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच !

मुंबई । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या खास निमंत्रणावरून आम्ही गांधीनगरात गेलो. त्यांचा उमेदवारी अर्ज भरायचा हे एक निमित्त होते, पण त्यानिमित्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ‘वज्रमूठ’ दाखवणे हा मुख्य हेतू होता. त्याचा परिणाम असा झाला की, काँग्रेस-राष्ट्रवादी कोल्हय़ांच्या पोटात दुखू लागले आहे. आम्ही सगळय़ांनी एकत्र येऊन गांधीनगरच्या व्यासपीठावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ताकद दाखवून दिली. महाराष्ट्र ज्यांच्या पाठीशी उभा राहतो त्याच ‘मिशन शक्ती’तून देशाला नवी प्रेरणा मिळते. शिवरायांचा महाराष्ट्र संकुचित नाही. तो अखंड हिंदुस्थानचा विचार करतो व त्यासाठीच दिल्लीवर भगवा झेंडा फडकत राहिला पाहिजे. भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच!, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली आहे

सामनाचे आजचा अग्रलेख

आम्ही गांधीनगरात गेलो व अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या. फक्त उमेदवारी अर्ज भरणे हेच तेथे जाण्यामागे एकमेव कारण नव्हते, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा महामेळावा यानिमित्ताने झाला. अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल, रामविलास पासवान, राजनाथ सिंहांपासून ‘रालोआ’चे अनेक दिग्गज या मेळाव्यात होते. आम्ही सगळय़ांनी एकत्र येऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ताकद दाखवून दिली. महाराष्ट्र ज्यांच्या पाठीशी उभा राहतो त्याच ‘मिशन शक्ती’तून देशाला नवी प्रेरणा मिळते. शिवरायांचा महाराष्ट्र संकुचित नाही. तो अखंड हिंदुस्थानचा विचार करतो व त्यासाठीच दिल्लीवर भगवा झेंडा फडकत राहिला पाहिजे. भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या खास निमंत्रणावरून आम्ही गांधीनगरात गेलो. त्यांचा उमेदवारी अर्ज भरायचा हे एक निमित्त होते, पण त्यानिमित्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ‘वज्रमूठ’ दाखवणे हा मुख्य हेतू होता. त्याचा परिणाम असा झाला की, काँग्रेस-राष्ट्रवादी कोल्हय़ांच्या पोटात दुखू लागले आहे. या कळा गर्भारपणाच्या नसून वांझोटेपणाच्या आहेत. कळा इतक्या पराकोटीच्या आहेत की, जनता त्यांच्यावर लवकरच शस्त्र्ाक्रिया केल्याशिवाय राहणार नाही. आमचे व्यवस्थित जुळले व सर्व कटुता विसरून आम्ही महाराष्ट्र व देशहितासाठी एकत्र आलो. त्यामुळे काहींना जी पोटदुखी लागली आहे त्यावर सध्या तरी उपचार नाहीत. हिंदुत्वासाठी, देशहितासाठी आम्ही एकत्र आल्याने विरोधकांच्या तोंडात जाणारा लोण्याचा गोळा खाली पडला हे त्यांचे खरे दुःख आहे. अजित पवार, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण वगैरे मंडळींनी आमचे गांधीनगरात जाणे फारच मनास लावून घेतले आहे. ही फितुरी वगैरे असल्याचा शब्दच्छल त्यांनी केला आहे. शिवसेना-भाजप या दोन हिंदुत्ववादी विचार असलेल्या पक्षांतील कटुता मिटली ही फितुरी आहे असे कुणास वाटत असेल तर त्यांच्या डोक्याचा अजहर मसुदी खिमा झाला आहे किंवा जैश-ए-मोहम्मदच्या अड्डय़ांवर बसून हे लोक रोज ‘ढोसत’ असावेत. ‘युती’चे तोरण बांधल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे मनोरथ धुळीस मिळाले आहे आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हा हे चिमूटभर उरलेले पक्षही धुळीस मिळालेले दिसतील. आम्ही पुन्हा ‘युती’ केली हा

आमचा व महाराष्ट्राच्या जनतेचा प्रश्न

आहे. तुम्ही तोंडाची डबडी वाजवायचे कारण काय? आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यायला बांधील आहोत व त्या जनतेच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. ‘युती’ झाल्यामुळे बऱयाच चांगल्या गोष्टींना गती मिळाली. स्वतः नितीन गडकरी यांच्यासारखे मोठे नेते आता जाहीरपणे सांगू लागले आहेत की, महाराष्ट्र अखंड राहील व स्वतंत्र विदर्भाची घोषणा करणाऱयांना फटकवून काढले पाहिजे असे ते म्हणाले. गडकरी यांच्या भूमिकेस मुख्यमंत्र्यांची संमती आहे व हा शुभशकुन आहे. महाराष्ट्रास तडे देण्याचे संकट ‘युती’मुळे टळले. आता ही फितुरी आहे असे जर काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना वाटत असेल तर या मंडळींना हुतात्मा स्मारकावर उभे करून खेटराने मारले पाहिजे. मुळात जे ‘फितुरी’ची भाषा करीत आहेत त्यांचा एक पाय तुरुंगात आहे व उद्या राज्यात ‘युती’ची मजबूत सत्ता येताच दुसरा पायही तुरुंगात जाणार आहे. कुणी जलसिंचनाच्या नावाखाली स्वतःचे आर्थिक ‘सिंचन’ करून घेतले आणि राज्याच्या तिजोरीशी फितुरी केली, तर कुणी बीडच्या जिल्हा बँकांत घोटाळे केले. यास फितुरी नाही म्हणायचे तर काय सचोटीचे प्रयोग म्हणायचे? मागची चार वर्षे हे विरोधक मेलेल्या सापासारखे पडून होते व महाराष्ट्रातील जनहिताच्या अनेक मुद्दय़ांवर शिवसेना आवाज उठवत होती. आज विरोधी पक्षाला जाग आली ती शिवसेनेच्या जागरूक भूमिकेने. विरोधी पक्षाची कर्तव्ये काय ते त्यांना आम्ही दाखवून दिले. नाहीतर महाराष्ट्रातील

विरोधी पक्ष म्हणवून घेणाऱयांच्या गोवऱ्या

सोनापुरात पोहोचल्याच होत्या. ‘युती’ होताच जनहिताचे अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावले. ही फितुरी असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गद्दारांची संपूर्ण पोलखोल करावी लागेल. कधीकाळी श्री. शरद पवार हे काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा अंगास राख फासून हिमालयात जाण्याची भाषा करीत होते, पण महाराष्ट्रात राखेचा काळा बाजार झाल्याने ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. विदेशी वंशाच्या सोनिया गांधी हे त्यांना आधी संकट वाटले. त्यातून त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ हा नवा पक्ष काढला. मात्र नंतर याच संकटाची उशी करून राष्ट्रवादीवाले झोपले. आता झोपलेल्यांना जागे करता येईल, पण झोपेचे सोंग घेऊन बरळणाऱयांना कसे जागे करता येणार? होय, आम्ही गांधीनगरात गेलो व अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या. फक्त उमेदवारी अर्ज भरणे हेच तेथे जाण्यामागे एकमेव कारण नव्हते, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा महामेळावा यानिमित्ताने झाला. अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल, रामविलास पासवान, राजनाथ सिंहांपासून ‘रालोआ’चे अनेक दिग्गज या मेळाव्यात होते. आम्ही सगळय़ांनी एकत्र येऊन गांधीनगरच्या व्यासपीठावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ताकद दाखवून दिली. महाराष्ट्र ज्यांच्या पाठीशी उभा राहतो त्याच ‘मिशन शक्ती’तून देशाला नवी प्रेरणा मिळते. शिवरायांचा महाराष्ट्र संकुचित नाही. तो अखंड हिंदुस्थानचा विचार करतो व त्यासाठीच दिल्लीवर भगवा झेंडा फडकत राहिला पाहिजे. भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समाजाच्या विकासासाठी मातंग तरुणांनी उद्योग आणि सहकार क्षेत्राकडे वळावे

News Desk

भारतात इतकी ताकद आहे की आपण शब्‍दकोशातील शब्‍दांचे अर्थ देखील बदलले !

News Desk

काँग्रेसला मोठा दिलासा! कर्नाटक न्यायालयाकडून ‘या’ आदेशाला स्थगिती

Darrell Miranda